Uncategorized

कारंजा तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे निदर्शने

Active News/05-10-20
एकनाथ पवार ता.प्र.कारंजा
   
    भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून नवीन आणलेल्या काळया कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असल्याचा काँग्रेसने आरोप करत या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशाने काँग्रेस नेते मो.युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले.
 
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर केले आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी, ते बिल मागे घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या विधेयकांमुळे शेतकरी उद्धवस्त होईल व कंपनी राज आल्याशिवाय राहणार नाही. मोजक्या उद्योगपतींना लाभ पोहचण्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. या बिलांमुळे भविष्यात शेतकरी, मजूर आदींची वाताहात होणार असल्याने विरोध करीत आहोत. तसेच नवीन कामगार कायद्यास विरोध असल्याचे यावेळी मो.युसूफ पुंजानी यांनी सांगितले.केंद्राने शेतकरी विरोधी कायदा मागेघ्यावा तसेच उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करून योगी सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते हाजी मो. युसुफ पुंजानी, वाशिम जिल्हा प्रभारी प्रकाश साबळे,दिलीप भोजराज,शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर,वाशिम जि.प सदस्य मीनाताई भोने,कारंजा प.स सदस्य मोनाली तायडे,मोइनोद्दीन सौदागर,कारंजा न.प. गटनेते ऍड. फिरोज शेकूवाले, आरोग्य सभापती सलीम गारवे, उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले, कय्युम जट्टावाले,चांद मुन्नीवाले,अ.रशीद,आरिफ मौलाना, जाकीर शेख,नगरसेवक सै. मुजाहिद,निसार खान,जावेदोद्दीन, सलीम प्यारेवाले,आसिफ खान,प्रदीप वानखडे ,राजू इंगोले,इरफान खान,गजानन जाधव,अफसर बेग,महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष ललिता थोटांगे, नायबाई क्षार,शहजादा अहेमद,कारंजा तालुकाध्यक्ष रमेश लांडकर, युवक काँग्रेसचे राज चौधरी, अमीर पठाण,एनएसयूचे अक्षय बनसोड,मनीष,भेलांडे,उमेश शितोळे,कादर अहेमद खान,हाफिज राज,फैजल खान,विजय देशमुख, रमेश रामटेके,उस्मान खान,अड वैभव लाहोटी, ताराबाई क्षार, रामदास भोने, मारोती कराळे,विठ्ठल लाड,रत्नपाल आदी सह कारंजा तालुका व शहर काँग्रेस कमिटी तथा सर्व काँग्रेस सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन अड संदेश जिंतूरकर तथा आभार कारंजा शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हामीद शेख यांनी व्यक्त केले.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close