Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

कागदी घोडे नाचवत शेतकरयांची दिशाभूल व थट्टा थांबवा; त्वरित मदत जाहिर करा –

शेतकरी संघर्ष संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख तथा वाशीम जिल्हाध्यक्ष गणेश अढाव

अन्यथा तीव्र आंदोलन

Active News/ washim
Amol more /kata konala Reporter
7517784623
वाशिम : दि. 17/10/20
हे वर्ष सर्वांगाने शेतकरी बांधवासाठी अडचणीचे ठरले आहे. कोरोनाने सर्वान्सोबत शेतकरी कुटुंबेही आर्थिकदृष्टया पुरती हवालदील झाली आहेत. अस्मानी संकटे म्हणून यावर्षी मोठ्या प्रमाणात सतत अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकरयांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तर शासकीय,प्रशासकीय बेजबाबदार, ढिसाळ व दिरंगाई कारभाराने मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे वितरण आणी त्यावर न केलेली मदत, पिकावर अनेक भागात पडलेल्या मोझाक व्हायरस रोगामुळे झालेले नुकसानिवर न केलेली मदत , शासकीय अध्यादेशातील दिरंगाई, पंचनामे चा फार्स ते करायलाही केलेला उशीर, हे कमी की काय अध्यादेशात विदर्भ मराठवाड्यातील शेतकरयांची शब्दछल करून शासन करीत असलेली थट्टा हि निंदनीय आहे. ” शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य ” त्याचा तिव्र शब्दात निषेध करीत असुन शासनाने कागदी घोडे नाचवने बंद करून शीघ्र गतीने यंत्रणा राबवित शेतकरयांना त्वरित मदत जाहीर करावी व आता आणि यापुढे शेतकरयांची थट्टा थांबवावी अन्यथा शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने शासनातील लोकप्रतिनिधी व प्रशासनातील संबंधीत अधिकारी यांच्याविरुद्ध प्रसंगी कायदा हातात घेऊन तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघर्ष संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा वाशीम जिल्हाध्यक्ष गणेश अढाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

विदर्भ – मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी हा अल्पभुधारक असुन कोरडवाहू शेती करतो. फार मोठ्या नद्या इकडे नाहीत. शासनाने मागे दोन महिन्यापूर्वी व आताही जो अध्यादेश काढला तो ” अतिवृष्टी व पूरामुळे ” नुकसान झाले त्या शेत पीकाचे पंचनामे करण्याचा आहे. म्हणून त्यांच्या माप दंडांनुसार इकडे अतिवृष्टी झालेली नाही व पूरानेसुद्धा पीकाची मोठी हानी झाली नाही. म्हणून हे शब्दछल करून शासन वेळकाढूपणा चालवून येथील शेतकरयांवर अन्याय करित असल्याचा संघटनेचा आरोप आहे. वास्तविक इकडे मात्र सततच्या पावसामुळे पीकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचे काय? त्याला शासन काही मदत करणार आहे की नाही? हे शासनाने आधी स्पष्ट करावे अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटना करित असल्याचे पत्रकात म्हटले आहे. पीक विमा विमा परतावा, नाफेडचे मागच्या वर्षाचे तूर व हरभरा पीकाचे अनुदान अजून बहुतांश शेतकरयांना मिळाले नाही किंवा त्यासाठीही नेहमी संघर्ष करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना पोर्टल या शासनाने बंद ठेवले आहे. परिणामी त्यात पात्र ठरलेले परंतु कर्जमाफी जमा न झालेले असंख्य शेतकरी सरकारी कार्यालयाच्या व बँकांच्या चकरा मारुन बेजार झाले आहेत. त्यामुळे त्यांना यावर्षी पीक कर्ज मिळाले नाही. त्यांचा हा संभ्रम कोण दूर करणार? त्यांना केव्हा न्याय देणार आहात? वाशीम जिह्यातील तीन तालुके सौर उर्जा कृषी पंप योजनेतून वगळण्यात आले! ते का? असे प्रश्न उपस्थीत करून शेतकरयांचे अस्मनी संकटांनी कंबरडे मोडले म्हणून त्यांना शासकीय आधार देणे गरजेचे असताना शासन व प्रशासनाने त्यांची चालवलेली थट्टा दिसत नाही का?!! कि, या विभागातील लोकप्रतिनिधी झोपले आहेत? का, त्यांना केवळ मते मागायला व कोरोना काळात फक्त पक्ष कार्यासाठीच बाहेर फिरायला वेळ आहे असा संतप्त सवालही अढाव यांनी विचारला आहे.

Amol More/kata konala(washim)

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .