Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

ऊद्या शेतकरी संघर्ष संघटनेची महत्वपूर्ण बैठक

वाशीम: दि. 28

शेतकरी संघर्ष संघटनेच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन उद्या दिनांक 29 अक्टूबर रोज गुरुवारला सकाळी 11: 30 वाजता स्थानिक संघटनेचे कार्यालय, अकोला नाका येथे करण्यात आले आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थानी तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थापक अध्यक्ष मा. राजुभाऊ वानखेडे हे राहतील. तर प्रमुख उपस्थितीत वाशिम जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ अढाव, हिंगोली जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ खिललारी, अकोल्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ इंगळे असतील.

आजवरच्या कार्याचा सर्कल, तालुका व जिल्हा निहाय आढावा घेतला जाईल. तिनही जिल्हातील राहिलेल्या तालुका कार्यकारिणी गठीत करणेसाठी दौरा काढणे ,
पद आणी त्या पदाची जबाबदारी याचे गांभीर्य व गरज यावर चर्चा करणे, संघटनेचा महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात होत असलेला विस्तार बघता तिनही जिल्ह्यातील उगम व मुख्य स्थान म्हणून तिनही जिल्ह्यातील संघटन प्रचंड व्यापक, सर्वसमावेशक व मजबूत बनविण्याचे दृष्टीने कार्यक्रम आखणी. शेतकरयांचे विविध प्रश्न व त्यावर संघटनेची भुमिका, आंदोलने यावर चर्चा.
पुर्व विदर्भ आणी खानदेश मध्ये संघटनेचा विस्तार करण्याचे दृष्टीने चर्चा. निष्क्रीय पदाधिकारी यांच्या बाबतीत चर्चा व निर्णय. कोरोनामुळे खंडीत झालेले गावोगावचे ” शेतकरी संवाद बैठका ” सुरु करण्याचे दृष्टीने चर्चा व निर्णय. संघटनेच्या सोशिअल मिडीया जबाबदारी वाटप, व्यापकता व सुसूत्रता आणने. विविध नवीन पदाधिकारी यांच्या निवडी केल्या जातील. तिनही जिल्हा व त्यातील तालुका कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व सर्कल प्रमुख यांच्यासहीत संघटनेत काम करण्यास वा पदाची जबाबदारी घेण्यास इछूक असणारया व्यक्तींनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष सुनिल जोगदंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .