Uncategorized

अतिवृष्टीने झालेल्या नुकसान सर्वेक्षणात शिरपूर हे गाव समाविष्ट करा – कपिल भालेराव

शिरपूर ( प्रतिनिधी ):- 9 ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाने महाराष्ट्र राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतातील हजारो एकर सोयाबीन ,कपाशी सारखे पीक पाण्याखाली आहेत. यावर्षी सुरुवातीलाच तिबार पेरणी झाली असून शेतकऱ्यांचे महामंडळाचे बियाणे देखील सुद्धा उगवले नाही .शासनाने नुकसान झालेल्या सर्व भागांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. परंतु या नुकसान सर्वेक्षणात शिरपूर गाव वगळण्यात आले आहे. त्यानुसार नुकसान सर्वेक्षनात शिरपुर गाव समाविष्ट करा असे येथील सामाजिक कार्यकर्ते कपिल भालेराव यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मा. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,माजी कृषीमंत्री शरद पवार ,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे. यासह राज्याचे कृषिमंत्री व सर्व राजकीय नेत्यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू आहेत. परंतु मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे .या अतिवृष्टी मध्ये सोयाबीन सह सर्व पिक पाण्याखाली गेले आहे .परतीचा पाऊस सतत मुसळधार असल्याने शेतात पाणी साचल्यामुळे ते सोंगने कठीण झाले आहे .उभ्या पिकाला कोंब फुटले आहेत .या पावसात काही शेतकऱ्यांनी सुडय्या लावल्या आहेत .या सुड्डय्या मध्ये जागीच कोम्ब फुटल्याने सोयाबीन काहीच कामी राहिली नाही .त्यामुळे सर्व पिकांची नुकसान झाले आहे .तरी शासनाने शिरपूर सह इतर ही गावे या नुकसानग्रस्त सर्वेक्षणात समाविष्ट करावी व या सर्व पिकांना शासनाने सरसकट शासकीय मदत जाहीर करावी.अशी मागणी शिरपुर शेतकरी वर्गाकडून या निवेदनात करण्यात आली आहे.
अन्यथा शिरपूर शेतकरी यांच्यावतीने मोठे आंदोलन उभे करण्यात येईल . या निवेदनाच्या प्रतीलीपी म्हणून मा. जिल्हाधिकारी साहेब ,मा. तहसीलदार साहेब ,ग्राम विकास अधिकारी ग्रा. प. शिरपुर ,महसूल मंडळ अधिकारी शिरपुर ,पोलीस स्टेशन शिरपूर यांना दिले आहे. या निवेदनावर कपिल भालेराव, विठोबा इंगळे ,विलास गावंडे, कैलास भालेराव ,रितेश बोराटे ,संदीप देशमुख, संतोष बाविस्कर ,अर्जुन गौर ,सुनिल घोडके, आमोल देशमुख ,प्रवीण बोराटे ,राजू जाधव ,अश्विन भांदुर्गे ,सचिन भालेराव ,आसिफ टेलर ,श्रीराम भालेराव ,संतोष गाभणे, गोपाल शिखरे ,बाबू गौरवे ,पिरु गौरवे, कीर्ती गावंडे, पांडुरंग तिरके ,छोटू रेघिवाले ,मोहम्मद आसिफ मोहम्मद शेख ,सुरेश जाधव,अर्जुन गौर , पांडुरंग बोबडे ,अशोक बोराटे, महादेव भालेराव ,राम भालेराव ,दुर्गेश मगर ,गंगू परसुवाले यासह अनेक शेतकऱ्यांनी सह्या केल्या.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close