Uncategorized

अकोल्यात चुना लागावं आंदोलन

Active News Network
प्रतिनिधी : अकोला
दिनांक २० ऑक्टोबर २०२०
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या उन्हाळी 2020 च्या ऑनलाइन परीक्षेत झालेल्या भोंगड कारभारा बद्दल चुना लागावं आंदोलन २१ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने आंदोलन करण्यात आले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा चे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर व परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख यांच्या फोटो वर चुना लावून हे आंदोलन करण्यात आले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा ने ठरवून दिलेल्या उन्हाळी २०२० च्या परीक्षांच्या वेळापत्रक तीन वेळा बदल करून Sgbau Pariaksha अँप डेव्हलप करण्यात आले होते , परंतु २०ऑक्टोबर२०२०रोजी सकाळी १०:०० वाजता ऑनलाइन होणारा पेपर कोणत्याच विद्यार्थ्यांचा लॉगइन झाला नाही.
परिक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी दिलेले मोबाईल नंबर नॉट रीचेबल दाखवत आहेत.
म्हणुन वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा येथे चुना लागावो आंदोलन करण्यात आले .
विद्यार्थ्यांच्या झालेल्या मानसिक त्रासाबद्दल व विद्यापीठाने केलेल्या फसवणुकीसाठी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर व परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख व ऑनलाइन अँप बनविणारी Promarc Software pvt.Ltd या कंपनीच्या मालकावर विद्यार्थ्यांची फसवणूक केल्यामुळे कलम ४२० कलम १२० व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे .ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक झाली त्यांना त्यांचे पैसे विद्यापीठाने परत करावे , विद्यार्थ्यांची परीक्षा परीक्षेचे पूर्ण नियोजन झाल्यावरच घ्यावी अशा मागन्या सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला च्या वतीने करण्यात आल्या .
या आंदोलनात वाशिम जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडी चे महासचिव सिदार्थ देवरे , वंचित चे जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अजित गवई व सम्यक विद्यार्थी आंदोलन वाशिम चे पारितोश इंगोले सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close