Uncategorized

स्वाभिमान संघटनेने उपोषणाचा इशारा देताच तात्काळ रस्ता दुरुस्तीच्या कामांना सुरुवात 

वाडा:प्रतिनिधी
संजय लांडगे
तालुक्यातील रस्त्याच्या दुरावस्थे बाबत स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेश (बंटी)पाटील यांनी आठवडा भरापूर्वी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता याची दखल घेत सोमवार पासून सदर रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
या उपोषणाच्या अनुषंगाने सोमवारी तहसील कार्यालयात एक विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीत स्वाभिमान संघटनेच्या मागण्या असलेल्यांपैकी बुधावली येथील कॉंक्रीटकरणाला सुरवात केली आहे, वाडा-भिवंडी मुख्य रस्ता खड्डे बुजवायला सुरवात झाली आहे, पाऊस थांबताच दोन दिवसात डांबरी करणाचे काम चालु होईल. डांबर व मटेरियल जागेवर दाखल झाले आहे.  कुडूस कोंढले रस्त्याचे व सापरोंडे फाटा उचाट तसेच डाकिवली फाटा ते चांबळे रस्ता डागडूजी ला सुरवात केली असल्याचे व ते वेळेत पुर्ण करणार असल्याचे लेखी पत्र तहसीलदार उद्धव कदम यांनी दिले तर वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी तालुक्यात जनता कर्फ्यू लागू असून आंदोलनाने शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे आंदोलन तूर्तास स्थगित करणेस सांगितल्याने उद्या होणारे उपोषण स्थगित केले असल्याचे जितेश पाटील यांनी सांगितले.
सोमवारी पार पडलेल्या या बैठकीत तहसीलदार उद्धव कदम व  वाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच इतर खात्यांंचे सर्व जबाबदार अधिकाऱी व स्वाभिमान संघटनेचे जिल्हाप्रमुख जितेश (बंटी) पाटील,  वाडा तालुका अध्यक्ष रवींद्र मेणे,  कुडुस शहराध्यक्ष स्वप्नील जाधव,  वसीम जळगावकर, कल्पेश पटेल, स्वप्नील पाटील  व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close