Uncategorized

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती बरोबरच वनशेती, फळशेती करावी : आमदार अमित झनक

नेहरू युवा मंडळ मुंगळाच्या वतीने शेतकऱ्यांचा बांधावर ५०० वृक्षांची लागवड

मालेगाव प्रतिनिधी
पारंपरिक शेती बरोबरच वनशेती, फळशेती केल्यास कमी पाण्यात, कमी मेहनतीत उत्पादन होऊ शकते. वन शेतीत साग, बाभूळ, निलगिरी इत्यादी प्रकारच्या शेतीत तुन उत्पादनातून फायदा घेता येते. तर सिताफळ, संत्रा, चिंच, आंबा, नारळ, फणस, चिकू, जांभूळ या झाड ची एकदा लागवड करुन दरवर्षी सतत उत्पादन देतात व त्याचा फायदा सतत होत राहते व शेती ला जोड धंदा मिळवुन देते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती बरोबरच वनशेती, फळशेती करावी असे प्रतिपादन रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमितभाऊ झनक यांनी केले.
मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत रेगाव व नेहरू युवा बहूउद्देशीय मंडळ मुंगळा यांच्या वतीने शुक्रवार दि. १८ सप्टेंबर रोजी ५०० सिताफळ वृक्षांची लागवड शेतकऱ्यांच्या बांधावर करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमाला रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमितभाऊ झनक, मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य तायडे, रेगाव ग्रामपंचायतचे सरपंच खंडारे, उपसरपंच ज्ञानेश्वर आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांचा बांधावर सिताफळ वृक्षांची लागवड करण्यात आली.
नेहरू युवा बहूउद्देशीय मंडळ मुंगळा च्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण करुन त्यांचे संगोपन करण्यात येते. वृक्ष लागवड व संवर्धन विषयी जनजागृती केली जाते. यावर्षी युवा मंडळाच्या वतीने पारंपरिक शेती बरोबरच शेतकऱ्यांना फळ शेतीकडे वळवुन वृक्षांची संख्या वाढावी म्हणुन कमी पाण्यावर येणाऱ्या सिताफळ या ५०० वृक्षांची लागवड शेतकऱ्यांच्या शेतावर/बांधावर करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विश्र्वास आडे, कर्मचारी रामेश्वर थिटे, पोलीस पाटील केशव गायकवाड, मेडशी येथील माजी पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे, मुंगळा येथील माजी उपसरपंच अनंता कुटे, सामाजिक कार्यकर्ते संतोष राऊत, गजानन केळे, वनविभागाचे मुंगळा वर्तुळाचे वनपाल राऊत, वनरक्षक प्रितेश वानखडे, मंगेश वाणी, युवा मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर वनस्कर, उपाध्यक्ष सुनील नखाते सदस्य वैभव क्षिरसागर, शुभम डोंबळे, देवा घुगे, अभिजित हमाने, विशाल डोंबळे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close