Slider
previous arrow
next arrow
Slider
ACTIVE NEWS

शिवाजी विद्यालय मुळावा येथील शालेय विद्यार्थिनीं सायकल वाटपाने आनंदीत……..

Active news Umarkhed.
Gajanan Wankhede. Taluka Reporter umarkhed.mob.9096746518.
Date.09.09.2020.
……………………………….
मुलगी शिकली प्रगती झाली हे बोध वाक्य आपण नेहमीच वाचतो, मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो, एक शिकलेली मुलगी मोठेपणी संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते, शिक्षणच स्त्री उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे म्हणून मुलींना शिक्षण देणे काळाची गरज आहे, मुलगी शिकली प्रगती झाली असे मत श्री शिवाजी विद्यालय मुळावा येथे मानव विकास मिशन प्रकल्प अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल वाटप करतेवेळी आयोजित कार्यक्रमात पं. स. सभापती प्रज्ञानंद विजयराव खडसे यांनी व्यक्त केले,
श्री शिवाजी विद्यालय मुळावा येथे मानव विकास मिशन प्रकल्प अंतर्गत ७० विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या, ग्रामीण भागात आजही अनेक गावात बस सेवा पोहचू शकली नाही, त्यामुळे मुलींना अर्धवट शिक्षण सोडण्याची वेळ येऊ नये करीता शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनी करीता मानव विकास मिशन प्रकल्पांतर्गत मोफत सायकल वाटपाचा निर्णय घेतला असून श्री शिवाजी विद्यालय मुळावा येथे नुकतेच 70 विद्यार्थिनींना कोरोनाच्या संसर्ग वाढीच्या अनुशंगाने फिजिकल डिस्टन्स चे नियम पळून सायकल वाटप करण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद विजयराव खडसे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तथा सदस्य शासकीय रुग्णालय उमरखेड डॉ अविनाश खंदारे, नामदेवराव पतंगे, मुख्याध्यापक सुरेश कदम सर, पर्यवेक्षक सुनील गोंडे, नारायण धबडगे, रवी शंकर धोटे, व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक सुरेश कदम, संचालन किसन जाधव तर आभार मंचक आमले यांनी केले.

गजानन वानखेडे; तालुका प्रतिनिधी उमरखेड.

editor-in-chief

editor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .