Uncategorized

विवाहितेला जेसीबीसाठी जिवे मारण्याची धमकी 

इचलकरंजी – जेसीबीसाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेला जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह पाच जणांवर शहापूर पोलिसांत ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आयेशा इम्रान द्राक्षी (वय 26, रा. मणेर कॉलनी, विजापूर, सध्या रा. तारदाळ)यांनी तक्रार दिली आहे. 

पती इमरान रफीक अहमद द्राक्षी, सासू जायदा रफिकअहमद द्राक्षी, सासरे रफिक अहमद जाफर साहब द्राक्षी, दीर सरफराज रफिक अहमद द्राक्षी (सर्व मणेर कॉलनी, विजापूर, कर्नाटक) आणि नणंद आस्मा हफिजहुसेन सातारकर (नेहरूनगर, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

हे पण वाचा – ह्रदयद्रावक! आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच

याबाबत पोलिसांनी दिलेली अधित माहिती अशी, सासरच्या मंडळीनी मुले होत नसल्याच्या कारणांतून आयेशा हिचा शारिरीक व मानसिक छळ केला. पती इम्रानने घरातील पडद्याच्या पाईपने केलेल्या बेदम मारहाणीत त्या बेशुद्ध पडल्या. तसेच अंगावरील दागिणे काढून घेऊन त्यांना घराबाहेर हाकलून दिले. याबाबत आज आयेशा यांनी पोलिसांत तक्रार दिली. याबाबत पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा नोंद केला आहे. 

संपादन – धनाजी सुर्वे 


Source link

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close