Uncategorized

रेस्टॉरंट, बार उघडण्यास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय

पुणे – राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी हिरवा कंदील दाखविला. तूर्त 50 टक्के क्षमतेने ते सुरू होतील. तसेच त्या बाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार करून आदेश काढण्यासही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेस्टॉरंट, बार सुरू होणार आहेत. 

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील रेस्टॉरंट, बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये ठाकरे यांनी रेस्टॉरंट आणि बार आसन क्षमतेच्या 50 टक्के सुरू करण्यास अनुकूलता दर्शविली, अशी माहिती पुणे रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली. या कॉन्फरन्समध्ये मुंबईतील संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी, नागपूरचे अध्यक्ष राजू जैस्वाल, औरंगाबादचे अध्यक्ष शिवाजी पाटील, ऑल इंडिया रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष गुरुबक्षसिंग कोहली आदी उपस्थित होते. 

आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

राज्यातील अनेंक शहरांत मॉल, हॉटेल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठा सुरू आहेत. रेल्वे, विमान, रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, रेस्टॉरंट बंद असल्यामुळे नागरिकांचीही गैरसोय होत आहे. तसेच हॉटेल- बार व्यावसायिकांचा व्यवसाय गेल्या सात महिन्यांपासून ठप्प झाल्यामुळे त्यांनाही लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या व्यवसायावर अवलंबून सुमारे 20 लाख कुटुंबे आहेत. त्यांचीही आर्थिक ओढाताण होत आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणले. त्या वर ठाकरे यांनी हॉटेल आणि बार 50 टक्के आसन क्षमतेने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तातडीने तयार करण्यास कॉन्फरन्सला उपस्थित असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांन सांगितले. मार्गदर्शक सूचना तयार झाल्यावर रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यासाठी 7 ऑक्टो्बरपूर्वी आदेश काढण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

जेईई ऍडव्हान्सच्या निकालाची तारीख निश्चित; उद्या मिळणार 'आन्सर की'

राज्यातील रेस्टॉरंट आणि बार असोसिशएशनचे एक लाखांपेक्षा जास्त हॉटेल व्यावसायिक सदस्य आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. पुण्यात सुमारे 8 हजार 500 रेस्टॉरंट आहेत. तसेच 1600 बार आहेत. राज्य सरकारने हा आदेश काढण्यास उशीर केला असल्यामुळे शहराच्या उपनगरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी या पूर्वीच रेस्टॉरंटस, बार सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी आदेश दिल्यामुळे हॉटेल आणि बार व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. 

व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद तूर्त स्थगित; राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक संस्था, संघटनांनी हॉटेल, बार सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदने पाठविली होती. त्यामुळे पुण्यात सायंकाळी सात नंतरही रेस्टॉरंट व्यावसायिकांना पार्सल सेवा ग्राहकांना पुरविण्यास नुकतीच परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी रेस्टॉरंट आणि बार उघडण्यासाठी राज्य सरकारकडे आग्रही मागणी केली होती. मुंबईतील हॉटेल लॉबीने यासाठी जोर लावला होता.


Source link

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close