Uncategorized

राजेश राऊत यांचा राजीनामा

ऍक्टिव्ह पोलीस टाइम्स,जालना
जालना/प्रतिनिधी:(भगवान धनगे)दि.2
जालना नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी आज त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.त्यांनी आपला राजीनामा नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्याकडे सुपुर्द केला.
सन २०१६-१७ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जालना नगर पालिकेवर काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता आल्यानंतर राजेश राऊत हे उपनगराध्यक्ष झाले होते.
परंतु सन २०१९ मधील विधानसभा निवडणुका वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे जालना शहराध्यक्ष आहेत.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .