Uncategorized

युवकांनो “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेचे स्वयंसेवक व्हा ! नंदकिशोर वनस्कर यांचे आवाहन

वाशीम प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार covid-19 नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमे अंतर्गत राज्य कोविड मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता या मोहिमेव्दारे राज्यातील शहर, गाव, वस्त्या, तांडे या मध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना आजार असल्यास योग्य उपचार आणि प्रत्येक नागरिकास वैयक्तिक भेटून आरोग्य शिक्षण द्यायचे आहे. तरी ही मोहीम दिनांक 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता या मोहिमेचा कालावधी मध्ये गृहभेटी देण्याकरिता आरोग्य पथक तयार करून प्रत्येक पथकात दररोज 50 घरी भेटी देण्यात येईल. त्यामध्ये व्यक्तीची तपासणी चाचणी व उपचार सेवा देल्या जातील. रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ट्रॅस, ट्रॅक, ट्रिट या त्रिसूत्रीचा वापर करून कोविड पादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता व त्याकरिता लोकसंख्येनुसार आरोग्य पथक तयार करून त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देऊन प्रत्येक पथकामध्ये एक कर्मचारी एक स्त्री व एक पुरुष अशी तिघाचे पथक असेल. पथकातील स्वयंसेवकांची स्थानिक निवड सरपंच व नगरसेवक यांना दोन स्वयंसेवकाची निवड करायची आहे. त्या पथकातील सदस्यांना कोरोना दुत असे संबोधण्यात येईल. या पथकाव्दारे महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरांवर हे पथक सर्वेक्षण करणार आहे. त्यासाठी लागणारे लोकप्रतिनिधी, युवा व युवती तसेच सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. तरी, इच्छुक युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे व सर्व नागरिकांनी व कुटुंबांनी या मोहिमेत सहकार्य करावे ही विनंती व आव्हान मालेगाव तालुक्यातील नेहरू युवा मंडळ मुंगळाचे अध्यक्ष नंदकिशोर वनस्कर यांनी केले आहे.

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close