Uncategorized

मोबाईल बँकिंगमुळे गोदावरी अर्बनच्या आधुनिक तंत्रज्ञान पर्वाला सुरूवात….

Active news Umarkhed
Gajanan Wankhede
Taluka Reporter.mob.9096746518.

Date.14.09.2020.

 गोदावरी अर्बनने आजवर ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरून १००० कोटींचा टप्पा पार केला असून आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल बँकिंग ची सुरवात करून ग्राहकांचा विश्वास आणखी सार्थ ठरवू असा आत्मविश्वास गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी व्यक्त केला.  गोदावरी अर्बन आणि समूहाच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी अर्बन ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाला सुरवात करत मोबाईल बँकिंग आणि अप्लिकेशचे लोकार्पण केले.यावेळी राजश्री पाटील बोलत होत्या.
             राजश्री हेमंत  पाटील यांनी गोदावरी अर्बन आणि गोदावरी समूहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. राजश्री पाटील यांचा वाढदिवसानिमित्त नांदेड ,हिंगोली जिल्ह्यात रक्तदान,रक्ततुला, महावृक्षलागवड ,महिलांना साड्यांचे मास्कचे वाटप करून विविध सामाजिक उपक्रम राबवून सोबतच सामाजिक अंतर पाळून मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात आला.सिडको येथील युवा शिवसैनिक डॉ.व्यंकटेश  मामीलवाड यांनी रक्तदान शिबिर घेतले.किनवट तालुक्यातील शिवणी -ईस्लापूर  सर्कलमध्ये महिलांना साड्या आणि मास्क चे वाटप करण्यात आले तर उमरी येथे गरजूंना अन्नधान्य किट चे वाटप आणि किवळा येथे  रक्तदान शिबिर घेण्यात आले होते या उपक्रमांना उस्फुर्त प्रतिसाद  मिळाला.तसेच कौठा येथे सुद्धा रक्तदान शिबिर घेण्यात आले.
तर जवळा बाजार येथे शिवसैनिक  चंद्रकांत शिंदे यांनी एक कुटूंब,एक वृक्ष हा उपक्रम राबवून साजरा केला. 
    यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत पाटील,आ.बालाजी कल्याणकर,जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर,उमेश मुंढे,दत्ता कोकाटे ,उपाध्यक्ष हेमलता देसले,व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर संचालक सर्वश्री प्रा.सुरेश कटकमवार,अजय देशमुख,प्रसाद पाटील,साहेबराव मामीलवाड,यशवंत सावंत जेष्ठ बाळासाहेब देशमुख बारडकर, सदाशिव पुंड, कीर्ती तगडपल्लेवार, व्यवस्थापक  (प्रशासन) सुरेखा दवे, यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी वाढदिवस शुभेच्छांना मनोभावे ऋण व्यक्त करताना राजश्री पाटील बोलत होत्या , गोदावरी अर्बनचा आजचा चढता आलेख पाहताना स्थापनेचा भूतकाळ आठवतो आणि गोदावरीचे आजचे हे यश  सहजा सहजी प्राप्त झाले नसून मागे  अनेक हात झटले आहेत.
संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील आणि अत्यंत काटेकोरपणे नियोजन  करणारे व्यवस्थापक धनंजय तांबेकर सर यांच्यासह गोदावरी परिवरासोबत  जोडला गेलेला प्रत्येक जण आज अभिनंदनास पात्र आहे . आपण पार केलेला १००० कोटींचा टप्पा हा तुम्हां सर्वांच्या प्रत्येकाच्या कृतुत्वाचे फळ आहे, आणि हे तुम्हां सर्वांना समर्पित करताना मनस्वी आनंद होतो.महाराष्ट्राने नाही तर संबंध देशाने अवाक होऊन पाहत रहावे अशी झेप गोदावरीने घेतली आहे.आणि हा गोदावरीच्या सहकार प्रवासातील महत्वाचा टप्पा आहे असेही राजश्री पाटील म्हणाल्या.आमच्या ग्राहकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सदैव सार्थ ठरवून ग्राहकांना दिवसेंदिवस दर्जेदार सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. मोबाईल बँकिंग हे त्यापैकीच एक महत्वाचे पाऊल म्हणावे लागेल. तंत्रज्ञानाचा क्षेत्रातील माहितीचा उपयोग करत आणखी दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असा भक्कम आशावाद राजश्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

गजानन वानखेडे तालुका प्रतिनिधी उमरखेड.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close