Uncategorized

मुस्लिम बांधवांनी तजिया मोहरम हा सण घरातच केला साजरा

Active news/ Pimpri sarhadd

प्रतिनिधी :- फिरोज शाह
मो. नं.8788905178
दि.०१/०९/२०२०

दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो हा सण

मुस्लिम बांधवांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या मोहरम ताजिया उत्सवानिमित्त दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येते. मुस्लिम बांधव मोहरम ताजिया हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. मोहरमच्या तिथीनुसार मुस्लिम बांधव ९ आणि१० या तारखेला सवारीची मिरवणूक काढतात.व ११या तारखेला तजियाचे विसर्जन करण्याकरिता ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी कोरोना या महामारी ने आतंक घातल्यामुळे यंदा प्रथमच मोहरम ताजिया हा सन मुस्लिम बांधवांनी आपल्या घरीच साजरा केला. प्रशासनाने सर्व समाज बांधवांना आव्हान केले होते की सर्व सण-उत्सव हे सार्वजनिक रित्या साजरे न करता आपल्या घरातच साजरे करावे. या आव्हानाला मुस्लिम समाज बांधवांनी समर्थन देऊन मोहरम हा सण आपल्या घरीच ३१ ऑगस्ट रोजी साजरा केला. या सना दरम्यान पिंपरी सरहद्द येथील युवक मंडळींनी मोहरम ताजिया हा सण सर्व ग्रामवासीयांनी आपल्या घरीच उत्साहात साजरा करण्याकरिता पुढाकार घेतला होता.

मुस्लिम समाजात मोहरम हा वर्षाचा पहिला महिना असतो.
मोहरम महिन्यातील पवित्र सण म्हणून मुस्लिम बांधव हा सण दहा दिवस साजरा करतात. पहिले नऊ दिवस मुस्लिम समाजाचे धर्मगुरू इमाम हुसेन यांच्या बलिदानाच्या यादे हुसैन कथांचे वाचन करत असतात.दरम्यान नवव्या व दहाव्या दिवशी सवारची मिरवणूक काढण्यात येते त्याच दिवसाला शहीद इमाम हुसेन यांच्या बलिदानाची जाण व्हावी यासाठी अनेक मुस्लीम बांधव रोजा पाळतात. तसेच सर्व बांधवांमध्ये सरबत चे वाटप करण्यात येते नंतर अकराव्या दिवशी ताजिया चे विसर्जन केले जाते.

घराघरात फतिहा पठण

अशुरा दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून मुस्लिम बांधवांकडून घरामध्ये विशेष खाद्यपदार्थ तयार करून फातिहा पठण करण्यात येत असते तसेच मशिदीमध्ये आशुराच्या नमाज पठण व प्रार्थना करण्यात येते.

firojshah

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close