मुळावा सह खेडे गावात कोरोणाचा वाढता प्रार्दुभाव
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
संदेश कांबळे
ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर
मुळावा
मो.9503151634
मुळावा प्रतिनिधी: मुळावा सह परिसरातील ग्रामिण खेडे भागात कोरोणाचा वाढता प्रार्दुभाव पाहता, सामान्य नागरीकामध्ये दहशत आणि भीती निर्माण होत आहे. पर्यायी सध्यास्थीतीमध्ये परिसरामध्ये एकुन 15 कोरोना बाधीत रूग्न आढळले असून मुळावा येथे 7, तरोडा 3, कुपटी 1, तर तिवरंग , पिंपळदरी, गंगणमाळ, पोफाळी प्रत्येकी एक रूग्न आढळ्याने एकच खळबळ उड़ाली आहे. मुळाव्यासारख्या लोकसंख्येने अधिक असलेल्या गावात कोरोणाचा वाढता प्रार्दुभाव पाहाता लॉकडाऊन मध्ये मुळावा गावात संस्थात्मक विलगीकरण करत मोठ्या प्रमाणावर पुणे मुंबईवरून आलेल्या नागरीकांना विलगीकरण करत काळजी घेण्यात आली होती. व या काळात प्रशासनानेही आपला पुरेपुर वेळ योग्य कर्तव्य बजावत दक्षता घेतली होती. परंतु
गेल्या एक आठवड्यापासुन स्थानिक मुळाव्यामध्ये कोरोणाबांधीतांच्या संख्येत दिवसेंनदिवस वाढ होत असुन, मुळावा येथे परीसरातील खेडेगावातील नागरीक येण्यास टाळाटाळ करत आहेत. तरी सुद्धा परिसरात व मुळावा गावात अत्तापर्यंत 15 रूग्न आढळुन आले असुन सुध्दा, प्रशासनाकडुन कुठल्याही प्रकारचे प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करण्यात आले नसुन जनजागृतीसाठी कुठलीही सुचना व खबरदारी घेतल्या गेली नाही. गावातील स्थानिक कोरोणागाव समीतीही सध्या अदृष्य असल्याचे कळते पर्यायी कोरोणाच्या वाढत्या प्रार्दुभाव पाहाता स्थानिक मुळाव्यामध्ये व मुळावा परिसरातील खेडेगावात कुठलीही प्रशासन यंत्रणा,उपाययोजना पाहिजे तशी राबवीली जात नसल्याने गावातील सामान्य नागरीकांच आरोग्य कोरोणाच्या पाश्र्वभुभीवर वाऱ्यावरच आहे .अस म्हणायला हरकत नाही. स्थानिक कोरोणाच्या पाश्र्वभुमीवर कोवीड बाबत सध्या आरोग्य यंत्रणा नेमकी काय भुमीका घेत आहे. असे विचारणा केल्यास तालुका वैदयकीय अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत ” मला फोन करू नका ” असे सांगीतले. एकुनच आरोग्याची मेख शिरावर असलेल्या तालुका वैदयकीय अधिकाऱ्याची अशी उत्तरे नक्कीच आरोग्ययंत्रणेवर प्रश्न निर्माण करीत आहे.
“मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्र आंतर्गत परिसरात एकुन 15 रूग्न आढळुन आले असुन त्या रुग्नाच्या जवळच्या संपर्कातील नागरीकांनी स्वयंस्पुर्तीने तपासनी करून घ्यावी,
वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा.
SANDESH KAMBLE
ACTIVE NEWS REPORTER MULAWA