Slider
previous arrow
next arrow
Slider
ACTIVE NEWS

मायबाप सरकारने कलाकाराच्या पोटाची सोय करावी-सोमनाथ नांगरे पाटील

जालना.जे.पी.जाधव(जिल्हा प्रतिनिधी)
वाघ्या मुरळी कलावंत आपल्या कलेद्वारे धर्मजागरण करून, कुलाचार पालन करून समाज प्रबोधन व सामान्य समाजसेवा करून भाविक भक्तांच्या आश्रया वर आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करते. ६ महिन्यापासून लॉक डाऊन असल्याने उपासमारीची वेळ आली आहे, तरी मायबाप सरकारने कलाकाराच्या पोटापाण्याची सोय करावी असे प्रतिपादन वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ नांगरे पाटील यांनी केले.कलावंतांच्या मुला मुलीचे शिक्षण खर्च, वस्तीगृहाची मोफत सोय शासनाने करावी तसेच नोकरीमध्ये आरक्षण द्यावे. कलाकारांच्या मानधनासोबतच पेन्शन योजना लागू करावी असे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष मीरा कावळे म्हणाल्या.
वाघ्या मुरळी लोककलेस शासन दरबारी मान्यता देऊन नोंदणी करून मोफत घरे द्यावीत.यासाठी विशेष योजना व आर्थिक विकास महामंडळ तयार करून कर्ज प्रकरणे मंजूर करून मदत करावी असे प्रतिपादन मराठवाडा उपाध्यक्ष परसराम घुसाळे यांनी केले या कार्यक्रमास मराठवाडा महाराष्ट्र सरचिटणीस अण्णा राठोड, महाराष्ट्र सरचिटणीस संतोष करवंदे, मराठवाडा संघटक दौलत चव्हाण, फुलंब्री ता. अध्यक्ष चंद्रकांत कावळे,गंगापुर ता.अध्यक्ष, संतोष बनकर, अनिल दुधे गंगापूर ता.उपाध्यक्ष, आव्हाड मामा,गणेशराव सुपारकर विजय काटे, नारायण भारती, विष्णू पडूळ, अमोल कुहीरे, मनीष घुसाळे, उमापमा वाघे, संजय जाधव, नवनाथ सोमधाणे, अंकुश वाघे, मधु सोमधाणे, गजु सोळंके, उमेश भुतेकर, नारायण सोळंके, एकनाथ बहुले, मनीष घुसाळे, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालना अध्यक्ष रामानंद उगले आभार प्रदर्शन जालना उपाध्यक्ष शाहीर काकडे यांनी केले

editor-in-chief

editor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .