Uncategorized

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

वाडा:प्रतिनिधी
संजय लांडगे
    कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी महाराष्ट्र शासनामार्फत  “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम दिनांक १५ सप्टेंबर २०२० ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंअंतर्गत ग्रामविकास विभाग ,आरोग्य व एकात्मिक बाल विकास विभागामार्फत नियुक्त कर्मचारी व स्वयंसेवक दररोज  कार्यक्षेत्रातील किमान ५० घरांना प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजनची पातळी तपासतील. ह्या भेटीदरम्यान कोरोनाबाधित व संशयित रुग्णांचा शोध घेतला जाईल. मोहिमेंअंतर्गत मधुमेहसह इतर आजार (उदा.हृदयविकार, मूत्रपिंडाचा आजार, लठठ्पणा इ.) असलेल्या व्यक्तींना संदर्भित उपचार देखील देण्यात येतील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणती महत्वाची पाऊले उचलायला हवीत याची माहिती दिली जाईल. मोहिमेदरम्यान कर्मचारी व स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबास दोनदा भेट देतील.
      कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी  आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. सदर मोहीम राबविणे कामी अधिक प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता इच्छुक स्वयंसेवकांनी त्यांच्या क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन मोहिमेत सहभागी होणे कामी आपली नोंद करावी. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व नागरिकांच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणार असल्याने अधिकाअधिक स्वयंसेवक मोहिमेसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार डॉ.उद्धव कदम, सभापती मोहन गवा, नगराध्यक्ष गीतांजली कोलेकर गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बोरपुल्ले यांचे मार्फत  लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांना करण्यात येत आहे.
वाडा तालुक्यातील एकूण ३८ हजार नऊशे पंचवीस घरातील ४३हजार चारशे ब्याऐंशी कुटुंबातील १९ लाख, एक हजार तीनशे तीस लोकसंख्येचे सर्वेक्षण ५९ टीम कडून १५ दिवसात करण्यात येणार सल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बोरपुल्ले यांनी देऊन या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Tags

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close