Uncategorized

भवानी ग्रा.पं .मधील अपहार प्रकरणाची कसून चौकशी करा…

ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा


अॅक्टीव न्युज उमरखेड गजानन वानखेडे.तालुका प्रतिनिधी उमरखेड.मोबा.९०९६७४६५१८.
दिनांक.१५.०९.२०२०.


तालुक्यातील बंदी भागातील भवानी ( रामपूर ) ग्राम पंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगाच्या लाखो रुपये निधीचा विकास कामांच्या नावावर फडशा पाडून अंदाधुंद अफरातफर करणाऱ्या ग्राम पंचायत सरपंच व सचिवाची कसून चौकशी करून त्यांचे विरुद्ध कठोर कार्यवाही करावी या मागणीसाठी जि .प . च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शेकडो गावकऱ्यांनी तक्रार दाखल करून संबंधितांची चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे .
जंगल व्याप्त भागातील अविकसित भागाचा विकास व्हावा यासाठी शासनाकडून विविध योजनांअंतर्गत निधी उपलब्ध होत असतांना बंदी भागातील जनतेच्या अशिक्षित पणाचा फायदा घेत थातूरमातूर कामे करून संबंधित अधिकारी व पदाधिकारी शासनाच्या निधीचा फडशा पाडण्यात गुंतले आहेत.
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून लाईट खरेदी , शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप , क्रिडा साहित्य वाटप , ग्रामपंचायतीस ऑरोपॅन्ट बसविणे , एलईडी खरेदी , शालेय विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी , अंगणवाडीतील मुलांची गणवेश खरेदी , शिलाई मशीन खरेदी , मास्क , सॅनिटायझर खरेदी , हाय मास्ट लाईट खरेदी, सार्वजनिक ठिकाणी सिमेंट बेंच खरेदी , यामध्ये मागील ४ वर्षापासून मोठया प्रमाणात सावळा गोंधळ करून लाखो रुपयांच्या निधीचा सरपंच व सचिवाने संगनमत करून लाखोंची अफरातफर केली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे .
सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधित सरपंच व सचिवांविरद्ध कठोर कार्यवाही करावी अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा भवानी येथील माजी उपसरपंच रामदास राठोड , ग्रा .पं . सदस्य संतोष मनभे , सुदाम पवार , संतोष वानखेडे , मोहन राठोड , शेषराव राठोड , लालसिंग चव्हाण यांच्यासह शेकडो गावकऱ्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांसह जि.प . चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या तक्रारीतून दिला आहे .

गजानन वानखेडे.

तालुका प्रतिनिधी उमरखेड.

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close