Uncategorized

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा सप्ताहाचे आयोजन

वाड्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आला

वाडा:प्रतिनिधी

संजय लांडगे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभर आयोजित केलेल्या  सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने वाडा तालुका बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी वाडा तालुक्यातील प्रसिद्ध पांडवकालीन प्राचीन तीळसेश्वर मंदिराच्या परिसरातील दशक्रियाविधी घाटाची स्वच्छता करण्यात आली तसेच वाडा शहरातील समशानभूमीची स्वच्छता करण्यात आली.

 या स्वच्छता मोहिमेत भाजपचे जेष्ठ नेते बाबाजी कठोले ,पालघर भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, पालघर भाजपा उपाध्यक्ष संदीप पवार, भाजपा वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या उपस्थितीत  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच वाडा तालुक्यतील भाजपा युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने रक्तदान तसेच प्लाझ्मादान ,वृक्षारोपण असे  विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती भाजपचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी दिली.

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close