Uncategorized

निम्मी मनपा क्वारंटाईन, प्रश्‍नोत्तराचा तासही रद्द

अमरावती ः महापालिकेतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी कोरोना संक्रमीत झाले असून त्यातील काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर काहीजण गृह विलगीकरणात आहेत. त्यामुळे शुक्रवारी (ता.18) झालेल्या आमसभेत कोणत्याच प्रस्तावावर समाधानकारक कामकाज होऊ शकले नाही. विशेष म्हणजे याच कारणास्तव प्रश्‍नोत्तराचा तास रद्द करण्यात आला होता. पुढील सभेत माहिती मांडण्याचे निर्देश महापौरांनी दिले. शौचालय घोटाळ्यावरील अहवाल मांडला गेला नाही.

चुकीच्या कस्टमर केअरवर केला कॉल अन्  ऑनलाइन व्यवहार पडला व्यापाऱ्याला महाग 

शुक्रवारी (ता.18) महापालिकेची ऑनलाइन आमसभा झाली. आमसभेच्या प्रारंभीच प्रश्‍नोत्तराचा तास रद्द करण्यात येत असल्याची सूचना नगरसचिवांनी दिली. संबंधित विभागातील अधिकारी संक्रमीत असल्याने हा तास रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासकीय प्रस्ताव व सदस्यांनी प्राधान्याने सुचविलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यास सदस्य संमत झाले. आकोली वळण रस्त्याला पोचमार्गासाठी मौजे रहाटगाव येथील जमिनीच्या अधिग्रहनासंदर्भातील अहवाल पटलावर ठेवण्याची सूचना करण्यात आली. मात्र नगररचना विभागाचे सहसंचालक आशिष उईके क्वारंटाइन असल्याने ते सभागृहात हजर नव्हते. ऑनलाइन सहभागी होत त्यांनी अहवाल रुजू होताच ठेवण्यात येईल असे उत्तर दिले. महापौरांनी पुढील सभेत अहवाल मांडावा असे निर्देश दिले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बडनेरा झोनमधील अडीच कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा अहवाल आमसभेत मांडण्यात येणार होता. आयुक्त स्वतः गृह विलगीकरणात असल्याने आमसभेत आले नाहीत. त्यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. त्यांचे शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते. हा अहवालही पुढील आमसभेत मांडण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या मुद्यावर झालेल्या चर्चेत पंधरा दिवसांत अहवाल तयार करून आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागास देण्यात आले. आयुक्तांनी त्यावर योग्य निर्णय घेऊन पुढील आमसभेत तो मंजूरीकरीता मांडण्याची सूचना करण्यात आली. उपायुक्तांचे रिक्त पद मनपा कर्मचाऱ्यांमधून भरण्यावर सदस्यांचा भर आहे. त्यावर पुढील महीन्यातील आमसभेत निर्णय होणार आहे.वलगाव मार्गावरील तारखेडा येथील सुतिकागृहासाठी शासनाकडून मनुष्यबळ व निधी मिळाणार असल्याने ते सुरू करण्यात येईल, असे महापौरांनी चर्चेअंती स्पष्ट केले. यामुळे या विषयावर सदस्यांनी चर्चेत खर्च केलेला वेळ निकामी गेला.

-संपादन ः चंद्रशेखर महाजन


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .