तरोडा नगरी मारुती मंदिर संस्थान येथे वृक्षारोपण…
Active news /Umarkhed.
Gajanan Wankhede Taluka Reporter.Umarkhed.
Mob.9096746518.
Date.18.09.2020.
तरोडा येथील मारूती मंदिर संस्थान येथे वृक्षारोपण करण्यात आले.मारूती मंदिर संस्थानला चारही बाजूंनी सुरक्षेसाठी मजबूत तार कुंपन करण्यात आले, त्यामुळे मंदिराची शोभा वाढीस लागली आहे.
मंदिर परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आला, मंदिर दुरूस्ती करण्यात आली तसेच नळ कनेक्शन घेण्यात आले, मंदिरासमोर भगवा ध्वजस्तंभ उभारण्यात आला, मजबुत प्रवेशद्वार बसवले, त्यामुळे मंदिर आकर्षक सौंदर्याने खुलुन गेले आहे.
हनुमान भक्त निवांतपणे मारुती मंदिर येथे बजरंग बली चे दर्शन घेऊन मानसिक समाधान व्यक्त करीत आहेत.
मारूती मंदिर संस्थान चे अध्यक्ष पंधरा दिवसांपासून हनुमान संस्थान विकासासाठी पराकाष्ठा करीत आहेत.गावातील नागरिकांनी मंदिरात हनुमान दर्शनासाठी ओढ लागली आहे तसेच भाविकांची आकर्षक सौंदर्याने मन मंदिरात येण्यासाठी रिघ लागली आहे.
डॉ.भाऊराव खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराभोवती वृक्षारोपण करतांना देविदास पाटील, विनायक चव्हाण,चंदनगिरी महाराज, आनंदराव ठाकरे, मधुकर महाराज,पत्रकार शिक्षण प्रेमी वानखेडे सर,सुधाकर चव्हाण, बाबूभाई पाटणकर, उपस्थित होते.
गजानन वानखेडे/तालुका प्रतिनिधी उमरखेड.