Uncategorized

जनावरांच्या लिम्पि त्वचा रोगाची लस पशुवैद्यकीय दवाखाना मध्ये उपलब्ध होणार!

विशेष संपादन / कैलास भालेराव (पत्रकार)

शिरपूर ता 16 ऑगस्ट
मालेगाव तालुक्यासह जिल्हा मध्ये जनावरांमध्ये लिम्पि या घातक त्वचा रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने या रोगाची लस जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे यांनी दिली आहे.
जनावरांमध्ये लिम्पि स्कीन डिसीज हा आजार जनावरांमध्ये दिसून येत आहे. जनावरांच्या त्वचेवर गोल गाठी तयार होत असून डोळ्यातून व नाकातून पाणी वाहत असल्याचे प्राथमिक लक्षण आहे. जनावरांच्या त्वचेवर होणारा हा विषाणूजन्य चर्मरोग असून याचा प्रादुर्भाव दुभती जनावरे गाई-म्हशी वर प्रामुख्याने दिसून येत आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने एक बाधित जनावरांपासून दुसऱ्या निरोगी जनावरास त्याची लागण होते. त्यामुळे निरोगी जनावरांना लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषद च्या वतीने जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात मार्फत सदर विषाणूजन्य आजारावर जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे .सदर लस पुढील दोन दिवसांमध्ये पशुवैद्यकीय रुग्णालय मध्ये मिळणार असून सर्व पशुपालक शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ शाम गाभने यांनी केले आहे.

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close