Uncategorized

गंगणमाळ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मास्क वाटप

वर्धापनदिनानिमित्त जिव्हाळा संस्थेचा स्तुत्य उपक्रम


संदेश कांबळे
ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर
मो.9503151634
दि.19/09/2020

प्रतिनिधी मुळावा :- इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्थेने 9 व्या वर्धापनदिनानिमित्त तालुक्यातील गंगनमाळ येथे दिलासा संस्थेचे संस्थापक जलतज्ञ, पाणीदार माणूस स्व. श्री. मधुकरजी धस यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुमारे शंभर पेक्षा ही जास्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यसोबतच मास्कचे मोफत वितरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाने सर्वकाही सामसूम आहे. कोरोनाच्या संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्राथमिक शिक्षण ऑनलाइन प्रणालीद्वारे देण्याचा प्रयोग शहरी आणि ग्रामीण भागात सुरू आहे. परंतु, ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या प्रचंड प्रमाणात भेडसावत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याबाबतची गोडी आणि अभिरुची दिवसेंदिवस कमी होत आहे. मुळात हीच बाब लक्षात घेऊन जिव्हाळा संस्थेने डोंगरांच्या कुशीत वसलेले मौजे गंगणमाळ येथे वही-पेन आणि मास्क आदी साहित्याचे मोफत वाटप केले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, शिक्षण घेण्यासाठीची जिद्द आदी बाबत सातत्यपूर्णता राहावी हीच भावना यामागे असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अतुल मादावार यांनी यावेळी सांगितले. कि कोरोनाच्या जागतिक संकटा मध्ये संस्थे ने शेकडो कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू च्या स्वरुपात मदत केली विविध विषयांवर कार्य केले तसेच त्यांनी जिव्हाळा संस्था सलग्नित सर्व दान्सुर व्यक्ती , मोठ्या दानशूर संस्था, शासकीय अशाकीय अधिकारी कर्मचारी, सर्व पत्रकार बांधव, सहकारी मित्र मंडळ तसेच संस्थे चे सर्व स्वयंसेवक आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्यक घटकाचे आभार मानून पुढील काळातही असेच सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती केली. संस्थेच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याने गणमाळ वासिया कडून कौतुक करण्यात येत आहे. उमरखेड येथील सुप्रसिद्ध व्यापारी कीर्ती एम्पोरियम चे मालक गजानन व्यवहारे आणि दर्शन भंडारी या दानशूर व्यक्तीने मदतीचा हातभार दिल्याने साहित्य वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नावाप्रमाणेच जिव्हाळा संस्थेचे कार्य विस्तृत आहे. स्वागत स्त्री जन्माचे (लेक वाचवा, लेक वाढवा, लेक शिकवा) अभियान, सेंद्रिय शेती (शिवांश क्म्पोष्ट खत ), गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवार, जिव्हाळा कन्यादान, स्त्री सशक्तिकरण आणि सक्षमीकरण ( बचत गट ) आधी अनेक प्रश्नावर संस्थेचे कार्य आहे. आतापर्यंत संस्थेने विविध दानशूर संस्था आणि व्यक्तीच्या माध्यमातून शेकडो जणांना संकट काळात संस्था धावून गेली आहे. यापुढे ही संस्थे चे सहकार्याचे काम अविरतपणे सुरू राहील. असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीता मादावार यांनी व्यक्त केले. यावेळी पोलीस पाटील कैलास मोरे, किसनराव सरकुंडे, सुधाकर जाधव, बबन वाहुळे, रंगराव खोकले, नंदाताई बुरकुले, जिव्हाळा संस्थे चे स्वयंसेवक संतोष बुरकुले, अतुल वाहूळे, कन्हैया काटकाडे, संतोष जाधव, अमोल भुसारे, धम्मदीप लोमटे, सोहम वाहूळे, विजय राठोड, सुमंगल वाहूळे, संदीप गाडगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुमेध वाहूळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थे चे स्वयंसेवक संतोष बुरकुले यांनी मानले.

SANDESH KAMBLE

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close