Uncategorized

कोहिनुर कॉलनी येथे कोरोना काळात वृक्षारोपण

(कॉलनी करांचा स्वयंस्फुर्त उपक्रम, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांची अकस्मात भेट)

Active News/16/09/20
एकनाथ पवार/कारंजा ता. प्र.

कारंजा-सद्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गात जो तो आपल्या स्वतःच्या कार्यात गुंतला आहे.प्रत्येकजण आपली व आपल्या कुटूंबियांची काळजी घेत आहे.अशा काळात कोहिनूर कॉलनीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कॉलनीच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोप चा उपक्रम राबविला आहे.
कोहिनुर कॉलनीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्याच्या कडेने वृक्षारोपन कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी दुग्धशर्करा योग जुडून आला कॉलनीच्या नाल्यांचे काम पाहण्याकरिता कारंजा नगरीचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर उपस्थित झाले.तेव्हा वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी यांना वृक्षारोपण आपल्या हस्ते करण्याची विनंती केली.विनंती ला होकार देत मुख्याधिकारी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झालेत,त्यांनी स्वतः वृक्षारोपण केले व कोहिनूर कॉलनीतील समस्त नागरिकांना या स्वयंस्फूर्त उपक्रमाचे कौतुक केलं.
नागरिकांनी मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांचा वृक्ष देऊन सत्कार केला.

सदर उपक्रमात राजू भेंडे, अनिल हजारे,हर्षल काठोळे, सुधाकर काळे, दामोधर पांडे,गजानन नेमाने,उके,महल्ले आदी कॉलनीमधील नागरिक उपस्थित होते.

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close