Uncategorized

कृषिदुतांनी दिली कृषि सेवा केंद्रास भेंट

रिसोड..
डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित सुविदे फाउंडेशन अंतर्गत कृषि महाविद्यालय रिसोड येथील सातव्या सञातील विद्यार्थी नितीन सुरेश वाघ याने ९ सप्टे,रोजी केनवड येथे असणार्या कृषि सेवा केंद्रास भेंट दिली.
फवारणीदरम्यान औषधी वापरताना शेतकरी वर्गाकडून ज्या चुका होतात ,व फवारलेल्या पिंकावर योग्य तो परीणाम दिसत नाही ,अशा प्रकारच्या चुका टाळन्यासाठी व शेतकरी वर्गाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कृषि सेवा केंद्रास भेंट देन्यात आली.
कृषि सेवा केंद्राचे मालक (Agro Dealer )प्रो प्रा प्रविण औताडे यांनी वेगवेगळ्या रासायनिक व जैविक खतांबद्दल तसेच वेगवेगळ्या किटकनाशक ,बुरशीनाशक, तननाशक व पिकांची वाढ करणार्या औषधी बद्दल माहिती दिली.
तसेच कोणती औषधी कशा प्रकारे किती लीटर पाण्यामध्ये किती मि ली माञा मध्ये वापरावी
याबद्दल सविस्तर माहीती दिली.
या प्रात्यक्षिकासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए एम अप्तुलकर सर, कार्यक्रम अधिकारी डी डी मसुडकर सर , तसेच प्रा एस आर कष्टे सर , प्रा आर वाय सरनाईक सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .