Uncategorized

उमरखेड येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा विशेष प्रकल्प

खेर्डा खुर्द शेती शिवारात दिले माती परीक्षणाची धडे :


नवनाथ गुठे/चोरद/दिनांक/14/09/2020….प्रतिनीधी
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगरूळपीर तालुक्यातील खेर्डा (खुर्द) शेतीशिवरात आज सोमवारी (ता.१४) रोजी माती परीक्षणाचा विशेष प्रकल्प राबविला. यावेळी कृषिदूत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले, जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण केले पाहिजे असे मार्गदर्शन या वेळी कृषीदूत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना करण्यात आले.माती परीक्षणातून उपलब्ध नत्र, स्फुरद, पलाश, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय कर्ब, जमिनीचा सामू, विद्राव्य क्षारांचे प्रमाण, आदींची माहिती या परीक्षणातून मिळाल्याने पीक लागवड सोपी होते. अशी माहिती यावेळी देण्यात आली. माती परीक्षण करताना जमिनीचा उंचसखलपणा लक्षात येऊन वेगवेगळे भाग पाडून ५ ते १८ नमुने घ्यावेत, त्यासाठी 20 सेमी. खड्डा करावा व कापडी पिशवीत माती प्रयोगशाळेमध्ये पाठवावे. असे आवाहन करण्यात आले यावेळी कृषी महाविद्यालय उमरखेड चे प्राचार्य डॉ. सी. यू. पाटील, उपप्राचार्य एस. के. चिंतले, विषय तज्ञ व मृदा शास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका सौ. सोळंके मॅडम व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्रा. वाय. एस. वाकोडे यांच्या मार्गदर्शनात कृषिदूत सुरज महादेवराव ठाकरे आदित्य गणेशराव राऊत या विद्यार्थ्यांनी माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक खेर्डा शेतीशिवारात करून दाखवले.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close