Uncategorized

आमदार राजेंद्र पाटणी यांचे हस्ते उंबर्डा बाजार येथे सौर ऊर्जा सोलर पॅनल चे लोकार्पण संपन्न

Active News/20-09-20
महेश उघडे/उंबर्डा बा.सर्कल सहप्रतिनीधी

उंबर्डा बाजार:- दिं 20 सप्टेंबर रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार माननीय राजेंद्र पाटणी यांचे शुभ हस्ते तालुक्यातील उंबर्डा बाजार येथे सौर ऊर्जा सोलर पॅनलचे लोकार्पण संपन्न झाले कार्यक्रमात विद्युत वितरण चे कार्यकारी अभियंता तायडे प्रामुख्याने उपस्थीत होते. या सौर ऊर्जा सोलर पॅनलमुळे उंबर्डा सबस्टेशन ची क्षमता 600 kva ने वाढली असून उंबर्डा सबस्टेशन वरून ज्या विद्युत ग्राहकांना वीजपुरवठा होत होता त्यांना योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळणार आहे. याठिकाणी होणारा हा सौर ऊर्जा पुरवठा कमी पडू नये ,सर्व वीज गाहकापर्यंत योग्य पुरवठा मिळावा या साठी आमदार राजेंद्रजी पाटणी साहेब यांनी विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता बोळे यांना निर्देश दिलेत की, ताबडतोब जमीन संपादन करिता नवीन वसौर ऊर्जा पॅनल सुरू करण्याकरिता प्रस्ताव पाठवावा. जेणे करून या विद्युत सबस्टेशन ची क्षमता वाढविता येईल व सर्वांना याचा उपयोग घेता येईल. या सौर ऊर्जा पॅनल मुळे येथील वीज ग्राहकांना योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळणार असल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात भाजपा तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे, विजय काळे, अनिल कानकीरड,राजीव भेंडे, मंगेश धाने, रुपेश शहाकार, शुभम बोनके, संकेत नाखले ,राजु गाढवे, डिगंबर काळेकर, घनश्याम लोहाना, बबन हळदे, पांडुरंग अवघड ,वि वि कं चे इंगळे सहा.अभियंता व कर्मचारी वर्ग इत्यादिसह अन्य मान्यवर उपस्थीत होते.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close