Uncategorized

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जारी

अॅक्टीव्ह न्युज / सातारा
वैष्णव जाधव – माण खटाव प्रतिनिधी
७६२७८६९११८
दिनांक :- १३/०८/२०२०
दहिवडी-
सातारा जिल्हयात गणेशोत्सव 2020 हा सण अत्यंत साध्या पध्दतीने व शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा करण्यातयावा यासाठी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि 22 ऑगस्ट ते दिनांक 1 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी आदेश जारी केले आहेत.
परवानगी घेतले शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता येणार नाही.मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शने इत्यादी आयोजीत करणेस मनाई करण्यात आली आहे.श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फूटांच्या मर्यादा आहे .मुती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.
सांस्कृतिक व गर्दीचे कार्यक्रमांऐवजी सामाजिक अंतर राखून आरोग्य विषयक उपक्रम ,रक्तदान शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि जनजागृती करण्यात यावी.
आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
गणपतीमंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. दिवसातून 3 वेळा मंडप परिसराचे सॅनिटायझेशन करावे. श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात येत आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, व्यक्तींमध्ये भौतीक दृष्ट्या कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता यावी.
कोविड-१९ अंतर्गत केंद्र शासन/राज्य शासन यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील. गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन, प्रशासनकडून काही अतिरिक्त सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे मंडळांना बंधनकार आहे.

Tags

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close