Uncategorized

सांगलीमध्ये बोटीतून लोकांना स्थलांतर करण्यास सुरुवात

अॅक्टीव न्युज / मिरज तालुका
प्रतिनिधी – नितिन पाटील,समडोळी
संपर्क – ९८६०२३७१०८
दिनांक – १७/०८/२०२०

मागील चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे व कोयना धरणातून मोठ्याप्रमाणात सुरु असणा-या विर्सगामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदी पातळी ३६ फुटांवर जावून रुद्रावतार धारण करत असून त्यामुळे नागरिकांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगलीच्या विविध भागात कृष्णा नदीच्या पाण्याचा शिरकाव होत असून त्या भागातील लोकांना बोटीतून योग्य ठिकाणी स्थलांतर करण्याचे कार्य महापालिकेकडून केले जात आहे.
४० ते ४५ फुटापर्यंत पाण्याची पातळी वाढली जाण्याची शक्यता वर्तविली जात असून गणपती मंदिर परिसरातील गणपती पेठ, टिळक चौक,मारुती मंदिर चौकातील व्यापारीही आपल्या दुकानातील ही साहित्य योग्य त्या ठिकाणी स्थलांतरीत करत असल्याचे चित्र दिसत आहे.
सांगली महानगरपालिके कडून नदिकाठच्या नागरिकांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

नितिन पाटील मिरज तालुका

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close