Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

शिरपूर जैन येथे ठीक – ठिकाणी स्वतंत्र दिन साजरा

ग्रा.पं.तर्फे शिरपूर वैद्यकीय अधिकारी व ठाणेदार यांना कोरोना योद्धा पुरस्कार !

शिरपुर दि.१५ (प्रतिनिधी) दिनांक १५ ऑगष्ट २०२० रोजी भारताचा  ७४ वा स्वतंत्र दिन अनेक ठिकाणी कोरोणा पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून साजरा करण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या शिवाय दरवर्षी प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्याने त्यांची उणीव मात्र सर्वांनाच जाणवत होती. पुढील भविष्यात अशा प्रकारे स्वतंत्र दिन साजरा करण्याची वेळ आपणावर येवू नये यासाठी सर्वांनी प्रार्थना केली, तर कोरोनाला हरवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना पाळणे किती आवश्यक आहे हे मान्यवरांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

                      शिरपूर जैन येथील ग्रा.पं.कार्यालय, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयीकृत बँका, कोंडबा तात्या ढवळे विद्यालय, अरिहंत प्राथमिक मराठी शाळा, सर्व जिल्हा परिषद शाळा, उर्दू शाळा, पीर मोहम्मद उर्दू स्कूल, स्व.पुंडलीकराव गवळी महाविद्यालय, ए.बी.सी. किडस कॉन्वेंट, अहिल्यादेवी इंग्लिश स्कूल, मातोश्री शालिनीताई गवळी इंग्लिश स्कूल, मातोश्री कासाबाई दाभाडे विद्यालय इत्यादी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी मोजक्याच मान्यवरांना बोलावण्यात आले होते. स्वातंत्र्य मिळाल्या पासून मागील ७३ वर्षात प्रथमच एवढ्या कमी प्रमाणात उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली.

            तर स्थानिक ग्रा.पं.च्या वतीने दरवर्षी काही पुरस्कार देण्यात येतात, त्या प्रमाणे शिरपूर वैद्यकीय अधिकारी व ठाणेदार यांना कोरोणा योद्धा हा पुरस्कार देण्यात आला.

स्वातंत्र्य दिनी माजी सरपंच रमेश महाजन यांच्या नातवाने ग्रा.पं. येथे झेंडावंदना करिता उपस्थिती दर्शविली, पोलीस गणवेशात आलेल्या ‘लिटल सिंघम’ ने मात्र यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर गणवेशात कोण आहे त्या व्यक्तीची नाही, तर त्या गणवेशा बाबत (वर्दी) बाबत लोकांच्या मनात किती सन्मान आहे. हे विशेष यावेळी दिसून आले.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .