Uncategorized
वारणा काठच्या भागात पिकांमध्ये पाण्याचा शिरकाव सुरु
अॅक्टीव न्युज / मिरज तालुका
प्रतिनिधी – नितिन पाटील, समडोळी
संपर्क – ९८६०२३७१०८
दिनांक – १७/०८/२०२०
मिरज पश्चिम भागात गेली चार दिवस पडत असलेल्या पाऊसाने व चांदोली धरणातून होणा-या विसर्गामुळे वारणाकाठ पूर्णपणे पाणीमय झाला आहे.
सतत च्या जोरदार पावसामुळे आलेल्या पुराचे पाणी नदीकाठच्या शेतातील पिकांमध्ये शिरत आहे. आधीच कोरोनाची महामारीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाच आत्ता आलेल्या पूरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झालेला आहे.
गेल्यावर्षीच्या पूराच्या अनुभवांने नदीकाठच्या वसत्यामधील लोकांचे व जनावरांचे मोठ्याप्रमाणात स्थलांतर करत आहेत. चार दिवसात आणखी पुरपरिस्थिती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नितीन पाटील,मिरज तालुका