Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

म्हसवडकर ग्रुपच्या वतिने आरोग्य केंद्रासमोर सुमारे ३ तास आंदोलन


अॅक्टीव्ह न्युज / सातारा
वैष्णव जाधव – माण खटाव प्रतिनिधी
७६२७८६९११८
दिनांक :- २८/०८/२०२०
म्हसवड-
म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असुन कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी म्हसवडसह जिल्ह्यात कोठेही बेड उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे हाल पाहुन शहरातील म्हसवडकर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत म्हसवड आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत प्रशासनाच्या विरोधात जोरदार केलेल्या घोषणाबाजीची तात्काळ दखल घेत माण च्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी म्हसवड येथे येवुन शहरातील धन्वंतरी रुग्णालय हे ताब्यात घेतले व आजपासुन हे रुग्णालय कोव्हीड रुग्णांसाठी वापरले जाणार आहे असे जाहीर केले. म्हसवडकर च्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाला अखेर यश मिळाले.
म्हसवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १५० च्या घरात गेली असुन शहरात दररोज वाढत असणाऱ्या रुग्णांना बेड ची व्यवस्था करण्यात यावी यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी केली होती मात्र त्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने म्हसवड शहरात रुग्ण दाखल करण्यास खुप अडचणी येत आहेत. येथील परिस्थिती हाताबाहेर जावु नये याकरीता सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शहरातील ३ खाजगी रुग्णालये अधिग्रहण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असताना देखील केवळ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे व खाजगी रुग्णालयाशी असलेले आपले हित संबध जोपासण्यासाठी प्रशासनाकडुन ती ताब्यात घेण्यात आली नव्हती. मात्र दररोज म्हसवड शहरात रुग्ण झपाट्याने वाढु लागल्याने अखेर शहरातील म्हसवडकर ग्रुप ने एकत्र येत येथील आरोग्य केंद्रातच ठिय्या मांडत म्हसवड शहरातील खाजगी रुग्णालयांचे अधिग्रहण प्रशासन करत नाही तोपर्यंत जागेवरुन न उठण्याचा निर्धार करीत प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. नारेबाजीची दखल घेत सदर आंदोलनाला माणच्या तहसिलदार बाई माने, व प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन त्यांना सोबत घेत येथील धन्वंतरी रुग्णालय गाठत ते अधिग्रहण करुन ताब्यात घेतले. यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर, डॉ. भारत काकडे, मुख्याधिकारी सचिन माने, स.पो.नि. गणेश वाघमोडे, मंडलाधिकारी दळवी, तलाठी आखडमल आदीजण उपस्थित होते.
सातारा- प्रतिनिधी

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .