Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

बदलापुर स्टेशनवरील स्काय वाॅकची नगरपरिषदेने साफ-सफाई करुन देण्याची शहर प्रवासी संघटनेची मागणी

बदलापुर(गुरुनाथ तिरपणकर)-कोरोना महामारीमुळे शहरातील जनता त्रस्त आहे. त्यात साफसफाईचा अभाव.त्यातच बदलापुर स्टेशनवरील स्काय वाॅककवर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. तो साफ व्हावा म्हणून बदलापुर शहर प्रवासी संघटनेचे दिपक वांयगणकर,सुनिल दळवी, सागर,सुहास सावंत,किशोर गुरव,दत्तात्रय पोसम,राजेंद्र नरसाळे,बाळासाहेब सावंत,एकनाथ गायकर,राम मोरे आदी सदस्यांनी आवाज उठवलेला आहे. स्वच्छतेची मागणी केलेली आहे. तसेच स्काय वाॅक स्वच्छ व्हावा म्हणुन बदलापुर शहर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधारक पतंगराव,कोअर कमिटी सदस्य विनय रेवंडकर,मंगेश गाड,उमेश चिपळुणकर व दक्ष नागरीकांनी “ई”मेल द्वारे मुख्याधिका-यांना निवेदने पाठविलेली आहेत. तसेच लिखित स्वरुपातही निवेदन पाठवले आहे.कोविड 19च्या पार्श्वभूमीवर स्वच्छता होणे गरजेचे आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्काय वाॅककवरील कुत्र्यांनी केलेली घाण,फाटके कपडे,प्लास्टीक बाॅटल,कचरा हे उचलुन स्काय वाॅक स्वच्छ व्हावा अशी मागणी बदलापुर शहर प्रवासी संघटनेने कुळगांव-बदलापुर नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांकडे केलेली आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .