Uncategorized

पांगरी नवघरे सर्कल बनले समस्यांचे माहेरघर

पांगरी नवघरे येथील पूल ठरत आहे जीव घेनारस्त्याची ही दैनंदिन अवस्था

सर्वत्र चिखलमय रस्ते; प्रशासन लक्ष देईल का ?

दत्तात्रय शिंदे: पांगरी नवघरे पासून ते अंमानी पर्यंत चा रस्त्याची फार दुर्दशा झाली आहे तीन
गावचा जोड असलेला पूल आज रोजी मोडकळीस आलेला आहे प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या अनेक वेळा निदर्शनास आणून सुद्धा आजपर्यंत कुठलीच उपायोजना तसेच रस्त्याची डागडुजी सुद्धा केली नाही सध्याच्या स्थितीमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे वरतून धरण भरलं की या पुलाची उंची कमी असल्यामुळे जाण्या-येण्यासाठी फार कठीण होत आहेपुलाची उंची वाढविण्या करीता अनेक वेळा बातमी सुद्धा प्रकाशित केले आहे मग नेमकं घोड अडलं तरी तरी कुठे प्रश्न संबंधित नागरिकांना पडत आहे संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे आज पर्यंत जेव्हा जेव्हा मी संबंधित विभागाच्या उप अभियंता यांच्या ला यांना कॉल करून विचारले असता त्यांच्यामधेअनेक
वेळा असे स्टेटमेंट देण्यात आले कि हा रोड आपल्याकडे नसून जिल्हा परिषद कडे आहे जिल्हा परिषद कडे विचारपूस केली की हा आमच्याकडे नसून बांधकाम विभागाकडे आहे अशातच दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे पण नेमका रस्ता कोणाकडे आहे हे कुणालाच कळले नाही आणि त्यानंतर आता कोरोणाचे सावंट पण वेळ सांगून येत नाही कारण कोल्ही लघु पाटबंधारे विभाग 100% तू भरलेला असून त्या धरणाचे पाणी आणि वरच्या धरणाचे पाणी या दोन धरणाच्या पाण्याचा संगम याच पुलाजवळ होतो त्यामुळे कुठल्या क्षणी जीवित हानी होईल हे सांगता येत नाही पुराच्या अवस्थेमध्ये तीन गावाच्या नागरिकांना जीव धोक्यात
घालून जावे लागते अशावेळी दुर्घटनेला आमंत्रण सांगता येत नाही पांगरी नवघरे येथील रस्त्याबद्दल चा दुसरा प्रश्न अजून प्रलंबित आहे पांगरी नवघरे येथील शेतकरी वर्गाने अनेक वेळा रस्त्याबद्दल जिल्हा प्रशासन तसेच तहसील प्रशासन यांना वेळोवेळी अर्ज दाखल करून कारवाई करावी अशी रीतसर तक्रार दाखल केल्या पण अद्याप पर्यंत कुठल्याच कारवाई झाली नसून प्रशासनाचा वरचा नागरिकांचा विश्वास उडत आहे पालक तत्त्वाला याची जाणीव आहे का कुठल्याही शेतकरी वर्गाला आपल्या शेतातील माल काढणे पेरणी करण्यासाठी ट्रॅक्‍टरच्या साह्याने नेआन करावी लागत असते मात्र हा प्रश्न सध्याच्या स्थितीमध्ये प्रलंबित आहे या रस्त्याचा प्रश्न कधी सुटणार का शेतकऱ्या ना आपल्या मागणीसाठी वारंवार वार प्रशासनाचे उंबरवठेओलांडावा लागत आहे मोठी निर्दयी बाब आहे पांगरी नवघरे पासून अंमानी पर्यंत या रस्त्याला खड्डे पडले आहे व हे खड्डे पाण्याने भरले असताना कुठला खड्डा किती खोल आहे हे काहीच समजत नाही तरी संबंधित विभागाची जो प्रश्न प्रलंबित आहे त्यांनी तत्काळ दखल घ्यावी जेणेकरून पुढे होणाऱ्या घटनेला तत्काळ अगोदरच उपायोजना केल्यावर ब्रेक लागेल पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये नागरिक तक्रार आपली दाखल करतच आहेत पण प्रशासन कुठलीच कारवाई करत नाही हा हा संग्रह दूर होणार का कधी सर्कल मधील अनेक प्रकरणाचे तक्रार दाखल करून सुद्धा कारवाई झाल्यामुळे अशातच नागरिकांचा विश्वास उडून जाईल पांगरी नवघरे गावातील रोड साईट च्या नाल्या बंद झाल्यामुळे येणारे घाणीचे पाणी गावामध्ये शिरत आहे शिवाय हेच पाणी रोडवर सतत रोडवर साचत असल्यामुळे त्याचे चिखल सदृश्य होत असल्यामुळे अनेक लोकांच्या गाड्या मोटरसायकल स्लिप होत आहे नाल्यांचा प्रश्न ही तसाच प्रलंबित आहे पांग्रि नवघरे सर्कल चा प्रश्न कधीच सुटणार का याची नागरिकांमध्ये खंत आहे

याबाबत रिसोड विधानसभेचे लाडके आमदार श्री अमित सुभाषरावजि झनक यांना विचारले असता ना भविष्यामध्ये हा रस्ता नक्कीच मार्गी लावू नागरिकांना कुठल्याही रस्त्याबद्दल त्रास होणार नाही याची आपण जाण ठेवू ग्रामीण भागातील सर्वच रस्ते दर्जेदार स्वरूपाचे करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि ते लवकरच पूर्ण होतील असे मत त्यांनी व्यक्त केले

मालेगाव चे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री खारोळे यांच्या मते बजेट पाठवली असून ती नाबार्ड मध्ये रुंदी करण्यासाठीसुद्धा वाढवली आहे बजेट प्लेट गव्हर्मेंट ला गेली असून तिकडं ने मंजूर झाले कि कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल 30 जून रोजी रोड ताब्यात घेतला असून विद्यमान आमदारांनी सुद्धा पूला संदर्भात पाठपुरावा केलेला आहे हा रस्ता रिठद पासून ते तोरनाळा पर्यंत कामासाठी मंजुरात घेणे आहे मंजुरात मिळालेला कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे

याबाबत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या रत्नमाला बाई उंडाळ यांच्याशी संपर्क साधला असता पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कल मधील जेवढे ही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असतील त्यांनी लवकरात लवकर त्या रस्त्याची डागडुजी करून सर्वसामान्य माणसांना जाण्यासाठी सोयीस्कर करावे या संदर्भात जे काही सहकार्य लागेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .