Uncategorized

दोडामार्ग तालुक्यात कोरोना बाधीत च्या संख्येत झपाट्याने वाढ

आरोग्य यंत्रणेसह जनमानसात खळबळ


Activ news/Dodamarg
नेहा ठाकुर/दोडामार्ग तालुका प्रतिनिधी.
दिनांक 14/8/2020.
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर दोडामार्ग तालुक्यातील कोरोना बाधीताच्या संख़्येत झपाट्याने वाढ होत असुन तालुक्यातील जनतेसह आरोग्य यंत्रणे समोर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.
दोडामार्ग तालुक्यात कोविड-19चे दुसऱ्यांदा खाते उघडल्यानंतर कोरोना बाधीताच्या संख़्येत वाढ होत आहे.मांगेलीतील कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होतो न होतो म्हणेपर्यत खानयाळे गावात एकाच घरात 9 कोरोनाबाधीत सापडले आहेत.आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे दोडामार्ग तालुक्याला ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचे ग्रहण लागते की काय? असा प्रश्न आरोग्य प्रशासन आणि जनतेसमोर आ वासुन उभा राहिला आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा ही खडबडून जागी झाली आहे.
गणेशोत्सव अवघ्या 8दिंवसावर येवुन ठेपला असतानाच कोरोनाबाधीत व्यक्ती मिळाल्यामुळे धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.गणेशोत्सोवाच्या धर्तीवर राज्याबाहेरील जिल्ह्याबाहेरील नागरिक आले आहेत , येणार आहेत त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्तक रहाणे गरजेचे आहे त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील जनतेने आरोग्य व प्रशासन यांचे नियम काटेकोरपणे पालन करुन खबरदारी घेणे आवश्यक आहे.अन्यथा वाढत्या कोरोनाला आळा घालणे अशक्य आहे.
दोडामार्ग तालुक्यातील आरोग्य प्रशासनाला ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोना आवाहन देत आहे असं च म्हणाव लागेल.

नेहा ठाकुर/ दोडामार्ग

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close