Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

कोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे

शिरपूर जैन ता १५

शिरपूर येथे दिनांक 13 व 14 ऑगस्ट  रोजी आलेल्या अँटीजन रॅपीट टेस्ट अहवालानुसार एकूण 32 कोरोना पोझीटिव्ह रुग्ण आढळल्याने दि 14 रोजी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये समितीची तातडीची बैठक पार पडली. दि 17,18,19,20 ऑगस्ट रोजी शहरामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिरपूर जैन येथे कोरोनाने पुन्हा धडक दिली असून हि धडक मात्र शहरवासीयांसाठी चिंतेची बाब आहे. कोरोनाणे यापूर्वी शिरपूर शहरात शिरकाव केला मात्र एका कुटुंबातील मोजक्याच व्यक्तींना त्याचा संसर्ग झाला आणि काही दिवसात ते रुग्णबरे सुद्धा झाले. त्या नंतर मात्र कोरोणा आपले काहीच करू शकत नाही या अविर्भावात शिरपूर येथील नागरिक वावरत होते, तर शासकीय आणि प्रशासकीय यंत्रना ज्यांच्यावर कोरोना संसर्ग, आणि प्रसार रोखण्याची जबाबदारी होती. त्यांनी सुद्धा शिरपूर वासीयांच्या या जीवघेण्या धाडसाकडे कानाडोळा केला. परंतु त्या नंतर मात्र कोरोणाने पुन्हा शहरात डोके वर काढले आहे. त्यामुळे शिरपूर ग्राम पंचायतीमध्ये कोरोना समितीची दि. 14 ऑगस्ट रोजी सरपंच सुनीता अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीमध्ये वाढलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे चिंता व्यक्त करण्यात आली व त्यावर काय उपाययोजना करता येतील, यावर विचारमंथन करण्यात आले. व महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शहरामध्ये रुग्णांचा आकडा 32 वर पोहचल्याने दि 17, 18 व 19,20 ऑगस्ट असे 4 दिवस संपूर्ण लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात यावे असा निर्णय समितीने घेतला आहे. याबाबत प्रशासनाला कळवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे. सरपंच सुनीता अंभोरे यांनी शहरवासियाना आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान यावेळी सरपंच सुनीता अंभोरे, उपसरपंच अस्लम गवळी, डॉ माणिक धूत, अशोकराव देशमुख, विश्वानाथ भालेराव तंटामुक्ती अध्यक्ष,संतोष भालेराव व्यापारी असोसिएशन अध्यक्ष शिरपूर, गणेश अंभोरे, तलाठी अंबुलकर, साठे, पत्रकार शशिकांत देशमुख, शंकर वाघ, संदीप देशमुख व कोरोना समितीचे सदस्य व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्तीत होते.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .