Uncategorized

कांबळे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी योगेश उदगीरकर यांच्या मागणीला यश…

अॅक्टीव्ह न्यूज – जिल्हा लातूर.
प्रतिनिधी – रवि बिजलवाड, लातूर शहर.
दि.१७/०८/२०२०

जळकोट तालुक्यातील मोजे येवरी पो.मंगरुळ येथील हरिजन बालाजी कांबळे यांच्यावर चार गावगुंडांनी आमच्या शेतात शेळ्या का चारल्या म्हणून मारहाण केली व ते गंभीर जखमी झाले होते व उपचारासाठी घेऊन जाता असताना त्यांच्या मुत्यु झाला असून, सदरील प्रकरणाकडे कुठल्याही लोकप्रतिनिधी चा व सामाजिक नेत्यांचे लक्ष नव्हते परंतु सध्या परिसरात योगेश उदगीरकर युवा मंच ला प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कुटुंबियाची भेट घेतली व लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती अवघ्या काही तासातच प्रशासनाने दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित दोन आरोपींना सुध्दा लवकरच जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन डी.वाय.एस.पी.यांना समस्त समाजबांधवांना व योगेश उदगीरकर युवा मंच यांना दिले.तर योगेश उदगीरकर युवा मंच यांच्या वतीने डी.वाय.‌एस.पी.मॅडम चे अंंभिनदन ही करण्यात आले.

रवि बिजलवाड, जिल्हा लातूर.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close