Uncategorized

वर्धेतील डौलापूरच्या भोयर कुटुंबाला पावला विठुराया; मिळाला प्रथम पूजेचा मान; उपमुख्यमंत्र्यासह करणार पूजा 

हिंगणघाट (जि. वर्धा) : पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत. या विठुरायाची पूजा आपल्या हातून व्हावी, असे प्रत्येक भक्‍ताला वाटते. विठ्ठलाची अशीच भक्‍ती करणाऱ्या डौलापूर येथील कवडू भोयर यांच्या कुटुंबाला विठ्ठलाच्या प्रथम पूजेचा मान मिळाला. उद्या गुरुवारी कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भोयर दाम्पत्य विठ्ठलाची महापूजा करणार आहे.

कार्तिक एकादशीला होणाऱ्या शासकीय पूजेच्या वेळेला डौलापूर येथील कवडू भोयर व त्यच्या पत्नी कुसुम यांना पूजेसाठी पंढरपूर येथे आमंत्रित केलेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत हे दाम्पत्य उद्या गुरुवारी पहाटे पंढरपूर येथे शासकीय पूजेत सहभागी होणार आहे.

जाणून घ्या – युवकाला पडले रातोरात श्रीमंत झाल्याचे स्वप्न; सकाळी कोंबडा आरवताच केला आत्महत्येचा प्रयत्न 

परंपरेनुसार एकादशीच्या दिवशी दर्शनार्थ्यांच्या रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या दाम्पत्याला हा मान दिला जातो. मात्र कोरोनामुळे मंदिर बंद आहे. यंदाची पंढरपूरची कार्तिकी यात्राही मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय महापूजेच्या वेळी प्रथम पूजनाचा मान मंदिरात सेवा देणाऱ्या विणेकऱ्यांमधून एकाला देण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला. मंदिरात सतत वीणवादन करीत पहारा देणाऱ्या सहा वीणेकऱ्यांमधून कवडू भोयर यांची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात आली.

कवडू भोयर हे मूळचे डौलापूर (ता. हिंगणघाट) येथील रहिवासी असून पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहे. दरवर्षी वारीला जाणे, पांडुरंगाची सेवा करणे हा त्यांचा दिनक्रम आहे. गेले काही वर्षांपासून ते सपत्निक पंढरपूरमध्ये राहून मंदिरात सेवा देत आहे. त्यांची पत्नी कुसुम भोयर यांचे माहेर हिंगणघाट तालुक्‍यातीलच घाटसावली गावचे बिडकर घराणे हे होय. 

सविस्तर वाचा – शेतमजूर असलेल्या दिलीपची ही संपत्ती पाहून व्हाल थक्क; संग्रहात आहेत तब्बल ५० हजार अमूल्य वस्तू 

या मिळालेल्या मानामुळे भोयर कुटुंब व आपल्या घरातील मुलगी प्रभू पांडुरंगाच्या पूजेमध्ये पूजेमध्ये सहभागी होण्याच्या बातमीने बिडकर कुटुंब आनंदी झालेले आहे. शासनामार्फत त्यांना पुढील एक वर्ष महाराष्ट्र एसटी बससेवा मोफत मिळणार आहे.

संपादन – अथर्व महांकाळ 


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close