रुक्मिणीच माहेरघर असलेल्या कौंडण्यपुरातील कार्तिकी महोत्सव रद्द; दिंड्या आणि दहीहंडीही नाही
तिवसा (जि. अमरावती) : माता रुक्मिणीचे माहेरघर आणि विदर्भाच पंढरपूर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथे शेकडो वर्षांपासून पार पडणारा कार्तिकी एकादशीचा सोहळा यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
गुरुवारी (ता. २६) कार्तिकी एकादशीला कौंडण्यपुरातील माता रुक्मिणीचे मंदिर बंद होते. सोबतच ३० आणि १ तारखेला होणारा दिंड्याचा रिंगण सोहळा आणि दहीहंडीचा कार्यक्रमही यंदा रद्द करण्यात आला आहे. तस परिपत्रक मंदिर प्रशासनाने काढले असून, कुठल्याही भाविकांनी गर्दी न करण्याच आवाहन करण्यात आले आहे.
कौंडण्यपूर हे माता रुक्मिणीचे माहेरघर आहे. दरवर्षी येथे कार्तिकी एकादशीचा सोहळा लाखो भक्ताच्या उपस्थितीत पार पडत असतो. त्यासाठी विदर्भातून मोठ्या प्रमाणावर लाखो विठ्ठलभक्त हे कौंडण्यपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
क्लिक करा – अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
एवढेच नाही तर ३० आणि १ तारखेला होणारा दहीहंडी व गोपाळकाल्याचा कार्यक्रम ही रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी कोणीही न येण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादन – नीलेश डाखोरे
Source link