बनावट मास्क बनावणाऱ्या युपीतील भामट्यांना मुंबई पोलिसांचा दणका
मुंबई – नामांकीत कंपन्यांचे बनावट एन 95 मास्क बनावणा-या उत्तर प्रदेशातील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी एका आरोपीसह पाच हजार बनावट एन-95 मास्क व मास्क बनवण्याचे साहित्य गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहे.
“किरीट सोमय्या यांना भाजपही सिरियसली घेत नाही” अनिल परब यांनी सोमय्यांना सुनावलं
कोरोनामुळे मास्कची प्रचंड मागणी वाढल्यामुळे बनावट मास्कही बाजारात येण्यास सुरूवात झाली होती. त्यावेळी 28 जूनला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विनस या नामांकीत कंपनीचे बनावट एन-95 मास्क घेऊन आलेल्या टेम्पोवर कारवाई करून 17 हजार 300 बनावट मास्क जप्त केले होते. याप्रकरणी एका आरोपीला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपासात उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील एका फॅक्टरीतून या बनावट मास्कला पुरवठा केला जात असल्याची माहिती निष्पन्न झाली. गुन्हे शाखेच्या कक्ष-3 चे प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने गुरुवारी गाझियाबाद येथील फॅक्टरीवर छापा टाकला. त्या कारवाईत विविध प्रकारचे पाच हजार बनावट मास्क जप्त करण्यात आले आहेत.
उद्या मंत्रालय गहाण ठेवणार का? ST कर्जप्रकरणी दरेकर यांची तिखट प्रतिक्रिया
याप्रकरणी मोहम्मद सोहेल मोहम्मद इद्रीस अन्सारी(31) याला अटक केली असून न्यायालयालयाने त्याला याप्रकरणी 2 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फॅक्टरीमधून दोन स्कीन प्रिंटसह 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Mumbai police arrest from Uttar Pradesh for making fake masks
——————————————————-
( संपादन – तुषार सोनवणे )
Source link