Uncategorized

चंद्रकांत पाटील 'आउटस्टॅंडींग; भाजपच्या इतर आमदार मात्र 'ऐटीकेटी

पुणे : पदवीधर मतदार संघाच्या नाव नोंदणीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील 'आउटस्टॅंडींग ग्रेड' मध्ये पास झाले असून बाकीचे भाजपच्या इतर आमदार मात्र 'ऐटीकेटी' लागली आहे.

पुणे पदवीधर मतदार संघासाठी जाहीर झालेल्या मतदार जाहीर झाली आहे. या मतदरात संघात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्हयांचा समावेश होतो. पाचही जिल्हयात मिळून एकूण 4 लाख 25 हजार 189 मतदार आहेत. त्यामध्येही सर्वाधिक मतदार हे पुणे जिल्हयात झाले आहे. पुणे जिल्हयात एकूण मतदार संघासंख्या 1 लाख 36 हजार 611 एवढी आहे. म्हणजे पाच जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या संख्येच्या 32 टक्के मतदार हे एकट्या पुणे जिल्हयातील आहे. त्यापैकी सर्वाधिक मतदार म्हणजे 42 टक्के मतदार पुणे शहरात असल्याचे दिसून आले आहे.
 
 'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

पुणे शहरातील एकूण आठ विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या 57 हजार 651 एवढी आहे. यापैकी कोथरूड विधानसभा मतदार संघात सर्वाधिक म्हणजे 15 हजार 957 , त्या खालोखाल खडकवासला मतदार संघात 14 हजार 582 मतदारांची नोंदणी झाली आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघातील आमदार चंद्रकांत पाटील हेच आघाडीवर राहिले असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी पाटील यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे या मतदार संघातून सर्वाधिक मतदार नोंदणीसाठी प्रयत्न केले असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे शहरातील इतर आमदार आणि नगरसेवकांनी मात्र ही निवडणुक फारशी गंभीर्याने घेतली नसल्याचे मतदार नोदंणीवरून समोर आले आहे. 

विधानसभा मतदार संघ निहाय मतदार नोंदणी 
-पुणे कॅन्टोमेन्ट – 2210 
-हडपसर – 7598 
-कसबा – 6667 
-खडकवासला- 14,582 
-कोथरूड- 15,957 
-पर्वती- 4589 
-शिवाजीनगर – 4580 
-वडगाव शेरी – 1468 

ऐटीकेटीतील मतनोंदणी 
शहरातील आठ विधानसभा मतदार संघापैकी सहा विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार निवडून आले आहे. तर महापालिकेत शंभर नगरसेवक आहेत. पुणे पदवीधर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या निवडणूकीसाठी जुनी मतदार यादी रद्द करून नव्याने मतदार यादी तयार करण्यात आली आहे. मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र त्यानंतरही सर्वाधिक नोंदणी हे पाटील यांच्या मतदार संघातच झाली. तर सर्वात कमी नोंदणी पुणे कॅन्टोमेन्ट आणि शिवाजीनगर मतदार संघात झाली असल्याचे दिसून आले आहे. त्या खालोखाल पर्वती आणि कसबा मतदार संघात नोंदणी झाली आहे. 


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close