गौतम पाषाणकर प्रकरणाला वेगळे वळण; बेपत्ता होण्यामागे बड्या राजकीय व्यक्तीचा हात?
पुणे : पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्याला बुधवारी (ता.28) वेगळेच वळण लागले आहे. त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर याने शहरातील एका बड्या राजकीय नेत्याने त्यांचे अपहरण केले असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या संदर्भात बुधवारी पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत तक्रार दिली आहे.
– महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या
पाषाणकर हे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून 24 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. ते बेपत्ता झाल्यानंतर वित्त पुरवठा करणाऱ्या काही व्यक्तींची शिवाजीनगर पोलिसांनी चौकशीही केली होती. दरम्यान पाषाणकर यांचा मुलगा कपिल याने संशयित राजकीय व्यक्तीचे नाव पोलिसांना काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मात्र पोलिसांनी संबंधित राजकीय व्यक्ती मागील तीन दिवसांपासून मंत्रालयात बसून आहे, यामुळे त्याची चौकशी करत आली नसल्याचे कपिल यांना सांगितले. मात्र कपिल यांनी बुधवारी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी संबंधित राजकीय व्यक्तीचे नाव सांगण्यास मात्र नकार दिला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनीही यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याशिवाय कोणतीच माहिती देता येणार नसल्याचे सांगितले.
– राज्य शिक्षक सेनेच्या समन्वयकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
आठ दिवस झाले मात्र अद्याप वडिलांचा काही ठिकाणा नाही. मी यापूर्वीच काही संशयित लोकांची नावे पोलिसांना दिली होती. त्यानुसार तपासासाठी पोलिसांना मदत होईल, अशी माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. तसेच याबाबत तक्रार दिली आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत, अशी माहिती कपिल यांनी दिली.
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
Source link