ताज्या बातम्या

भाजपाध्यक्ष अमित शहा लालबागचा राजाच्या चरणी

भाजपाध्यक्ष अमित शहा लालबागचा राजाच्या चरणी

मुंबई : गणपती दर्शनासाठी मुंबईच्या एक दिवसाच्या भेटीवर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लालबागचा राजासह, सिध्दिविनायकाच्या दर्शनासह, सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देवून गणपतीचे दर्शन घेतले.

आज दिवसाच्या मुंबई भेटीवर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज प्रथम मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी वांद्रे पश्चिम येथिल सार्वजनिक मंडळाला भेट दिली.या भेटीनंतर त्यांनी सिध्दिविनायक मंदिरात जावून दर्शन घेतले. गणेशोत्सवात शहा हे मुंबईत येवून प्रसिध्द अशा लालबागच्या राजाचे दर्शन घेतात आजही त्यांनी लालबागचा राज्याचे दर्शन घेतले. यावेळी त्याच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ. आशिष शेलार आ. राजपुरोहित उपस्थित होते.

Show More

Related Articles

Check Also

Close
Back to top button
Close