जैन मुनींच्या हत्तेच्या निषेधार्थ मूक मोर्चा;
शिरपूर येथील जैन बांधवांचा सहभाग
शिरपूर जैन
जैन समाजाचे संत आचार्य काम कुमार नंदी मुनी यांची कर्नाटक राज्यामध्ये नृशांस हत्या करण्यात आली होती त्या हत्तीच्या निषेधार्थ आज शिरपूर येथे जैन बांधवांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
जैन धर्माचे मुनी यांची कर्नाटक राज्यामध्ये काही संविधानिक तत्त्वांनी अमानुषपणे हत्या करून व त्यांच्या शरीराचे तुकडे करून फेकण्यात आले होते या निंदनीय घटनेचा संपूर्ण जैन समाज निषेध करीत आहे शिरपूर येथे येथे जैन समाजाच्या वतीने येलक श्री सिद्धांत सागरजी महाराज यांच्या नेतृत्वात सदर घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चा मध्ये शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ आज जैन समाजा आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला . व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली .सदर मूक मोर्चा निकलंक निकेतन पासून पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आला. पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले व या ठिकाणी सिद्धांत सागर महाराज यांनी उपस्थित जैन बांधवांना संबोधित केले ते बोलताना म्हणाले की साधू संतांची हत्या करणे ही भारताची संस्कृती नाही अहिंसेच्या मार्गाने जाणारा व अल्पसंख्यांकाचा दर्जा असणारा हा समाज आहे .
भारतामध्ये एक सक्षम सरकार असताना अहिंसेच्या पुजाऱ्याची हत्या होत असेल तर निश्चितच या अल्पसंख्यांक समाज सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण होत आहे. असे ते बोलताना म्हणाले.