ब्रेकिंग

एबीसी किड्स कॉन्व्हेंटचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

एबीसी किड्स कॉन्व्हेंटचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

शिरपूर,

चिमुकल्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता शाळांमधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तर सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड विद्यार्थ्यांमध्ये वाढावी त्यांचे स्टेज डेरिंग वाढावे या करिता वार्षिक स्नेहसंमेलन सारखे कार्यक्रम शाळा प्रशासनाकडून आयोजित केले जातात. शिरपूर येथील एबीसी किड्स कॉन्व्हेंट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वतीने रिसोड रोड शिरपूर येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी स्नेहसंमेलन दिनांक १५ फेब्रुवारीला उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य पुरुषोत्तम मुंदडा, अशोक आंभोरे, विजय अंभोरे, सलीम गवळी, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर उल्हामाले, संतोष आढागळे, यादव खोरणे, रामेश्वर डुखवाल, सुशीलकुमार मुंदडा, शशिकांत देशमुख, बालु मस्के, गजानन देशमुख, कैलास भालेराव , गोपाल वाढे, विजय धोंगडे, शाम दिक्षीत, केंद्रप्रमुख असद खान अजिद खा, मो. इलाज, संदीप देशमुख, दीपमाला बुकशेटवार, मुख्याध्यापक गणेश बोबडे, उपमुख्याध्यापीका योगिता बरांडे व सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , प. पू. ओंकारगिर बाबा, माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वर्ग 1 च्या विद्यार्थ्यांनी मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम कसे होत चालले आहेत याचा देखावा गाण्याच्या नृत्यातून सादर केला. तर केजी टू पासून ते फोर क्लासच्या मुलींनी वेगळ्या पद्धतीचे उखाणे घेऊन सर्वांचे मन जिंकले बाल कलाकारांचे मा. मुख्याध्यापक पुरुषोत्तम मुंदडा यांनी या मुलांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक फर्स्ट स्टँडर्डची विद्यार्थिनी नेहा बोबडे हिने केले तर सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका रोहिणी भालेराव, जयश्री घायाळ यांनी तर पुनम खिल्लारे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामेश्वर डूखवाल, सुशीलकुमार मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक गणेश बोबडे यांचे सह शाळेच्या शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे