ब्रेकिंग

पीक विमा वेबसाइटचा सर्व्हर डाऊन; नोंदणी रखडली

0 0 6 4 9 2
[wonderplugin_carousel id="1"]

सैय्यद इमरान


मालेगाव (प्रतिनिधी ) ;- शासनाने जाहीर केलेल्या एक रुपयात पीकविमा योजनेला राज्यभरासह मालेगाव तालुक्यात ही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. असे असतानाच काही दिवसापासून फॉर्म भरण्याचा सर्व्हर डाऊन झाल्याने नोंदणी रखडली आहे. शेवटचे ४ दिवस बाकी असल्याने विमा भरण्यासाठी सीएससी केंद्र व ई-सेवा केंद्रात गर्दी होत असल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांसह सीएससी केंद्र चालक यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळी वेबसाइट जेव्हा आधार सातबाऱ्यासोबत पडताळणी करण्याची वेळ येते तेव्हाच ती बंद पडते दिवसभरात साधारणतः पाच ते दहा मिनिटे ही वेबसाइट सुरू राहात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यांची इच्छा असतानाही या योजनेत त्यांना सहभाग घेता येत नसल्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 9 2
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे