महाराष्ट्र

अहिल्यादेवी इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

सोशल मीडियाचे दुष्परिणाम यावरील नाटिका ठरली लक्षवेधी

0 0 6 4 9 8
[wonderplugin_carousel id="1"]

शिरपूर :
शिरपूर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित अहिल्यादेवी इंग्लिश स्कूलमध्ये या चिमुकल्यांच्या शाळे मध्ये दि.०७/०२/२०२४ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात लहान चिमुकल्यानी विविध नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली,मोबाईल आणि सोशलमिडियाचे होणारे दुष्परिणाम, आजची पिढी कशा प्रकारे सोशल मिडीयाच्या आहारी जाऊन शिक्षणापासून दूर जात आहे, आणि याला वेळीच पायबंद घातल्या गेला नाहि तर त्याचे होणारे परिणाम व कशा प्रकारे मोबाईल पासून परावृत्त होता येईल यावर उत्कृष्ठ अशी नाटिका सादर केली. तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलाला अफजल खानाचा वध या थीम वर आधारित कलाविष्कार सादर केलेला शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील रुद्र गोपाल वाढे याने सर्वांची वाहवा मिळविली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वामनराव ढवळे व कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे सचिव डॉ.गजानन ढवळे हे होते. मार्गदर्शक म्हणून पोलिस उपनिरीक्षक रवींद्र टाले, ढवळे विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन वाहुरावाघ केंद्रप्रमुख असदखान पठाण होते. प्रमुख पाहुणे हरिभाऊ ढवळे, बाळकृष्ण ढवळे, यादवराव ढवळे, शशिकांत देशमुख, नंदकिशोर उल्हामाले, गोपाल वाढे आणि आनंद देशमुख होते. तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भूषण ढवळे यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4.7/5 - (4 votes)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 9 8
[wonderplugin_carousel id="1"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे