ब्रेकिंग

वैद्यकीय महाविद्यालय मंगरूळपीर तालुक्यातच व्हावे या मागणीचे शिवसेना-युवासेना- शिव आरोग्यसेनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]


अनंता घुगे/मंगरुळपीर तालुका प्रतिनिधि/दिनांक 28/082023
वाशिम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूरात झाले आहे व ते मंगरूळपीर तालुक्यात व्हावे या मागणीसाठी आज (सोमवारी) ता.28 रोजी मंगरूळपीर तालुक्यातील शिवसेना, युवासेना व शिव आरोग्यसेनेचा पदाधिकारी यांच्या वतीने ऊपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले त्या निवेदनात अतिशय मुद्देसूद अशी माहिती नमूद करण्यात आली व मंगरूळनाथ ला वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास समस्त जिल्ह्याला कसे फायदेशीर राहिल याबद्दल मुद्दे टाकण्यात आले, वाशिम जिल्ह्यात भौगोलिक दृष्टीने पाहता मंगरूळनाथ तालुका हा मध्यभागी आहे जवळपास सर्व तालुक्याना लागून असून दळण- वळणाचा दृष्टीने सुद्धा सोयीस्कर आहे, सोबतच समृद्धी महामार्ग सुद्धा तालुक्यातून गेला आहे त्यावर अपघाताचे प्रमाण पाहता एक सुसज्ज रुग्णालय असणे अत्यावश्यक आहे जेणेकरून अपघात ग्रस्ताना तातडीने मदत होईल सोबतच मंगरूळनाथ तालुक्यात सद्या फक्त ग्रामीण रुग्णालय आहे व त्यात सुद्धा पाहिजे तशा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत त्या कारणाने मंगरूळनाथ तालुक्यातच वैद्यकीय महाविद्यालय व्हावे हि मागणी आज शिवसेना – युवासेना – आरोग्यसेनेचा वतीने करण्यात आली त्यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामदास पाटील सुर्वे, माजी तालुकाप्रमुख अनिल पाटील राऊत, शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख विवेक नाकाडे, शिव आरोग्यसेना जिल्हाप्रमुख शिवा सावके, युवासेना जिल्हाप्रमुख जुबेर मोहनावाले, शहरप्रमुख सचिन परळीकर, बंडू वैद्य,निलेश पेंढारकर,युवासेना शहर प्रमुख सुनिल कुर्वे, बाळकृष्ण रोकडे,अमोल ठाकरे, प्रकाश अपूर्वा,बाळू घोडचर, श्रीकांत राठोड, मोहन राऊत, ज्ञानेश्वर भाडंगे, गोपाल नाकाडे व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे