आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

चोरद येथील मृत निलगायचे वन अधिकारी यांनी केला घटनास्थळी पंचनामा

0 0 6 5 0 5
[wonderplugin_carousel id="1"]

 

मंगरुळपीर तालुक्यातील चोरद येथील शेतकरी जनार्दन बाबाराव गुठे यांचे गट क्रमांक 71 चोरद शेतशिवारात ता.8 आॅगष्ट रोजी सकाळी जनार्दन गुठे यांचा भाचा नामे अनंता लक्ष्मणराव घुगे वय 21 वर्ष हा शेतात किटकनाशकची फवारणीसाठी गेला असता त्याला नीलगाय म्रुत अवस्थेत आढळुन आली होती याबाबतची माहिती अनंता घुगे यांनी वाशिम जिल्हयाचे मानद वन्य जीव रक्षक गौरव कुमार ईंगळे यांना आज ता 9 आॅगष्ट रोजी भ्रमनध्वनीवरुन दिली असता सदरची बाबतीत वन्य जीव रक्षक गौरव कुमार ईंगळे यांनी वनाधिकारी यांना माहिती दिली सदरची माहिती मिळताच घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी रुपेश जामकर क्षेत्र सहाय्यक मंगरूळपिर अति. व गजानन डाखोरे वनमजूर वनोजा कु. शिंदे वनरक्षक यांनी मा. अमित शिंदे सर स. व. सं. रो. ह.यो.अति तथा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा. कारंजा यांच्या मार्गदर्शनात मृत नीलगाय ची पाहणी केली यावेळी घटनास्थळी चोरद येथील शेतकरी संतोषराव गुठे तेजराव घुगे गणेश घुगे शाम गुठे यांचेसह अनंता घुगे है उपस्थित होते.सदर मृत नीलगाय वन्य प्राणी बिबटने हला केल्याचे मौका स्थळावरून समजल्याने तेथील शेतकरी व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे व घाबरून न जाता सदर क्षेत्रात काही दिवस शेतातील कामे लक्षपूर्वक करण्याचे वनअधिकारी / कर्मचारी यांनी सांगितले .

प्रथम दर्शनी निलगायचे म्रुत्युचे कारण सांगता येणार नाही शवविश्छेदन केलयानंतर माहिती मिळु शकेल निलगाय ईतर कुठल्या कारणाने मरण पावल्यानंतर ईतर वन्य प्राणी सुद्धा त्यांचे लचके तोडु शकतात चोरद येथील गावकर्यांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
गौरव कुमार ईंगळे
(मानद वन्यजीव रक्षक वाशिम)

 

माझ्या मामाची शेतीची मी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातिल पिके घेण्यासाठी अहोरात्र धडपड करत असतो आज सकाळी नेहमी प्रमाणे शेतात गेलो असता नीलगाय म्रुत अवस्थेत आढळुन आली सदरची घटना पाहता माझे डोळे भरुन आले आमच्यासमोर म्रुत नीलगाय पाहुन माझे मन स्तब्ध झाले याबाबतची माहिती मी वाशिम जिल्हयाचे मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार ईंगळे यांना माहिती दिली असता तातडिने वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले मी गौरव कुमार ईंगळे आणि वनाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो
अनंता घुगे (शेतकरी)
चोरद.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 5
[wonderplugin_carousel id="1"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे