You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

शिरपूर जैन येथे तालुकास्तरीय प्रश्न्न मंजुषा कार्यक्रम संपन्न

शिरपूर :  खादिमीन ए उम्मत या नांदेड येथील संस्थेच्या वतीने दिनांक १६ जानेवारी२०२० रोजी तारीख ए इस्लाम हा तालुका स्तरीय प्रश्न मंजुषा कार्यक्रम स्थानिक जि.प.उर्दू कन्या शाळेत  आयोजित करण्यात आला होता या कार्याक्रमध्ये मालेगांव तालुक्यातील उर्दू शाळांचे मिळून ६३ विध्यार्थी सहभागी झाले होते.त्यापैकी जि.प उर्दू कन्या शाळा येथील ३ टीम ९ मुली आणि जि.प.उर्दू मुले येथून २ टीम ६ मुले जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र झाले असून दिनांक १८ जानेवारी २०२० शनिवार रोजी वाशीम येथील तवक्कल फंक्शन हॉल मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न होणार आहे.

खादिमीन ए उम्मत या संस्थेविषयी सांगायचे म्हणजे २००६ साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून मागासलेल्या अल्पसंख्यांक समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून महामानवांच्या कार्याची माहिती, इतिहास सांगणे,विध्यार्थी जीवनात घातक अशा मोबाईल व टीव्ही पासून दूर ठेवून त्यांचा फक्त शैक्षणिक कामाकरिता कसा वापर करता येईल ते समजावून सांगणे. तसेच पोलीस प्रशासनाला समाजातील एकोपा, शांती, बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी मदत करणे हि आहेत. याच धर्तीवर आधारित एकूण ८४२ प्रश्नांची प्रश्नमंजुषा आधारित हि तालुका स्तरीय प्रतियोगिता जि.प.उर्दू कन्या शाळा शिरपूर येथे संपन्न झाली. या परीक्षेच्या माद्यमातून मुलांना स्पर्धा मध्ये सहभाग प्रेरित करणे, प्राचीन इतिहास प्रस्तुत करणे व जनजागृती करणे,ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना सहभागी करून त्यांना प्रोत्साहित करणे असे प्रमुख उद्देश यावेळी आयोजकांच्या वतीने मो.इस्माईल नांदेड, शे.फिरोज वाशीम,मो.शोएब मंगरूळपीर,अनवरशाह, मो.खुबेब नांदेड यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मोहीब खा पठाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शिरपूरचे अध्यक्ष असलमखान  पठाण यांच्या सह पत्रकार कैलास भालेराव, शेख सुलतान, गजानन देशमुख, गोपाल वाढे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक  मुजीब खा पठाण, मो.हनीफ,रफिक खा, शे.मजीद, हरून खा, इब्राहीम खा, नासिमोद्दिन, सैफोद्दिन इ.उपस्थित होते  सूत्रसंचालन मो.इलीयास यांनी केले. प्रास्ताविक शाहीद इकबाल यांनी तर आभार प्रदर्शन मो.नइम यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिसराम केले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close